कोण होता 3 वेळा ताजमहाल आणि राष्ट्रपती भवन विकणारा असली करामती मि.नटवरलाल..! टाटा बिर्ला आणि अंबानीला चुना लावणारा..!किंवा बंटी..!
बॉलिवूड मधील अमिताभ बच्चन अभिनित मि नटवरलाल हा चित्रपट अत्यन्त प्रसिद्ध झाला.पण हा चित्रपट ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे तो खऱ्या जीवनातील मि नटवरलाल..किंवा मिथिलेश कुमार श्रीवास्तव..! हा माणूस ‘मिस्टर नटवरलाल’ नावाने ओळखला जात असे आणि कामही तसेच करत असे. हा मिस्टर नटवरलाल हा एखादी व्यक्ती नसून ठगाचा मुखीया बनला. दुसऱ्यांना फसवून पैसा कमावणारे, लुबाडणारे सर्वच ४२० लोक या कॅटेगरीत आले. मंडळी नटवरलाल इतका करामती होता की त्याने चक्क ताजमहाल तीनदा विकला होता.
हा नटवरलाल नेमका होता तरी कोण आणि त्याने असे काय केले..?चला तर जाणून घेऊ..
ह्या मि नटवरलालने सुरुवातीच्या काळातील वकिली केली.नटवरलाल हा बिहारच्या सिवान जिल्ह्यात जन्मला. तो सुरुवातीला वकिली करत होता. वकिली करतानाच त्याला शोध लागला की आपण बनावट सही करू शकतो. आणि इथूनच मिथिलेश कुमार श्रीवास्तव पासून मि नटवरलाल बनण्यापर्यंतच्या प्रवास सुरू झाला.खोट्या सह्या करण्यात तरबेज झालेल्या नटवरलालने वकिली सोडून बनावट सह्या करण्याच्या जोरावर गुन्हे करण्यास सुरुवात केली. त्याची तब्बल ५० वेगवेगळी नावे होती. तो वेष बदलण्यात माहीर होता. त्याने तर एकदा चक्क तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची हुबेहूब सही केली.त्याने ज्यांना फसवलं त्या लिस्टमध्ये धीरूभाई अंबानी, टाटा, बिर्ला इ मोठी नावे आहेत. ७०, ८० आणि 90 च्या दशकात नटवरलालची जबरदस्त दहशत होती.
नटवरलालने राजीव गांधींच्या नावाने एकदा 32 हजार रु चा चुना लावला होता. तो एका म्हाताऱ्या माणसाचा वेष धारण करून घड्याळाच्या दुकानात शिरला आणि त्याने राजीव गांधींच्या नावाने ९३ घड्याळांची ऑर्डर दिली. दुसऱ्या दिवशी तो घड्याळ घेण्यास दुकानात गेला आणि त्याने घड्याळाची किंमत म्हणून ३२,८२९ रुपयाचा बँक ड्राफ्ट दिला. घड्याळ नटवरलालकडे सोपवल्यानंतर समजलं की हा ड्राफ्ट नकली होता. तोपर्यंत अर्थातच नटवरलाल पसार झाला होता.
कोणी ताजमहाल कसं काय विकू शकत का? ह्या प्रश्नाला उत्तर हो आहे.. नटवरलाल फॉरेनर्सना स्वतःची ओळख सरकारी अधिकारी म्हणून सांगायचा. यातून त्याने ३ वेळा ताजमहाल, २ वेळा लाल किल्ला आणि एकदा राष्ट्रपती भवन विकून टाकलं होतं. विशेष म्हणजे त्याने संसद भवन त्यात असणाऱ्या खासदारांसह विकलं होतं.
नटवरलाल ९ वेळा पोलिसांच्या हाती लागला पण प्रत्येकवेळी तो जेलमधून पळून जाण्यात यशस्वी झाला. ८ राज्यात त्याच्यावर १०० पेक्षा जास्त खटले चालू होते. मोस्ट वाँटेड असूनही तो कधी पोलिसांच्या हाती लागला नाही.
नटवरलालला ११३ वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. पण त्यातील जेमतेम २० वर्ष तो जेलमध्ये राहिला. वेगवेगळ्या मार्गाने तो जेल मधून निसटला. त्याला 24 जून 1996 मध्ये शेवटचं पकडलं तेव्हा तो ८४ वर्षांचा होता. कानपूर जेलमधून हॉस्पिटल मध्ये नेत असताना तो सटकला आणि पुन्हा कधीही दिसला नाही.
सरकारच्या दृष्टीने तो एक गुन्हेगार असला तरी त्याच्या मुळच्या गावात तो त्याच्या चांगल्या कामासाठी प्रसिद्ध होता. तो जेव्हा श्रीमंत होऊन गावात आला तेव्हा त्याने गावात पैसे वाटले.त्यामुळे गावातल्या लोकांच्या नजरेत तो आजही एक हिरो आहे. गावातल्या लोकांप्रमाणे तो श्रीमंतांना लुटून गरीबांत वाटायचा. एकूणच तो गरिबांचा रॉबिनहूड होता.
अमिताभ बच्चन यांच्या मिस्टर नटवरलाल पासून ते आताच्या इम्रान हाश्मीच्या राजा नटवरलाल पर्यंत त्याने चित्रपटांवर आपला प्रभाव पाडला.तर अभिषेक बच्चन अभिनित बंटी और बबली देखील त्याचाच परिपाक होता. नटवरलालच्या आयुष्यावर आधारित आज तक या वृत्तवाहिनीवर जुर्म नावाची मालिका देखील होऊन गेली.
२००९ साली नटवरलालच्या वकिलाने कोर्टात याचिका दाखल केली की नटवरलालच्या नावावर असलेल्या सगळ्या केसेस मागे घेण्यात याव्यात. कारण २५ मे, २००९ साली त्याचा मृत्यू झाला आहे. याविरुद्ध नटवरलालच्या भावाचं म्हणणं होतं की नटवरलाल मरून चक्क १३ वर्ष झाली आहेत. म्हणजेच १९९६ सालीच तो मेला. तो नक्की कधी मेला हे आजही गूढ आहे.






