Maharashtra

नाशिक पोलीस आयुक्तलयात कोरोना चा पहिला मृत्यू, इंदिरानगर पोलीस

नाशिक पोलीस आयुक्तलयात कोरोना चा पहिला मृत्यू, इंदिरानगर पोलीस

प्रतिनिधी शांताराम दुनबळे

ठाण्यातील कर्मचारी अरूण टोंगारे यांचा मृत्यू, नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून. नाशिक-:शहर पोलीस आयुक्तलयात कोरोना ने पहिला बळी घेतला असुन इदिंरानगर पोलीस ठाण्याचे हवालदार अरूण टोंगारे वय ५२ राहणार वासननगर पाथर्डी फाटा यांचा मृत्यू आज झाला आहे. तीन आठवड्यापूर्वी त्यांना नाशिक येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते परंतु प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबई येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलापाठोपाठ शहर पोलीस दलात कोरोना ने शिरकाव केला आहे इदिरांनगर पोलीस ठाणे हद्दीतील वङाळागांव येथे कर्तव्य बजावत असताना टोंगारे व इतर दोन कर्मचारी यांना संसर्गजन्य विकार झाला होता सुरवातीला त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबई येथे हालविण्यात आले होते मूळचे खेरवाङी तालुका निफाङ येथील रहिवासी असुन त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे एक मुलगी मुबईत भाभा रिसर्च इन्रस्टिट्युट सेंटर मध्ये अभियंता आहे तर दोन मुलांचे शिक्षण सुरू आहे. इदिरानगर पोलीस ठाण्यातील दुसरे कोरोना बाधित हवालदार माञ बरे झाले असून त्यांना ङिसचार्ज देण्यात आला आहे विशेष म्हणजे त्यांना पोलीस हवालदार टोंगारे यांनी रूग्णालयात दाखल केले होते अशी माहिती त्यांच्या सहकार्याने दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button