Amalner

Amalner: अमळनेर तालुका आम आदमी पार्टीची संघटनात्मक बैठक संपन्न!

Amalner: अमळनेर तालुका आम आदमी पार्टीची संघटनात्मक बैठक संपन्न!

शहर व तालुक्यात नवीन नियुक्त्या करणे बाबत झाला ठोस निर्णय!!

आम आदमी पार्टीचे गुजरात प्रदेशाध्यक्ष तसेच महाराष्ट्र सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी दिलेल्या निर्देशा नुसार अमळनेर शहर व तालुक्यातील बूथ बांधणी मोहीम व सभासद नोंदणीस प्रारंभ करण्यात येत असल्याची माहिती आप चे तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली.
दि.01/06/2023/रोजी गुरुवार. आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील अंमळनेर तालुका येथे जाहीर सर्वानुमते, नवीन तालुका शहर कार्यकारणी पद नियुक्ती करणे बाबत मीटिंग घेण्यात आली, आम आदमी पार्टीमध्ये सहभागी नवीन लोकांना पदभार देण्यात आला. आगामी काळात सभासद नोंदणी, बूथ बांधणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या बैठकीस नाना पाटील (तालुकासचिव), पत्रकार धनंजय सोनार, राजेंद्र पाटील (संघटन मंत्री), महेंद्र साळुंखे (शहर सचिव,) रामकृष्ण देवरे (शहर संघटक,) भागवत बाविस्कर (अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष,) नामदेव महाले (ता.उपाध्यक्ष,) राजेंद्र जाधव (शहर सहसचिव,) प्रकाश लांबोळे (उपाध्यक्ष,) मनीषा नारायण पाटील (महिला तालुकाध्यक्ष), नारायण पाटील आदी उपस्थित होते!
सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारून येणाऱ्या निवडणुकीत सर्व पदाधिकारी जोमाने कार्य करून दाखवू, आम आदमी पार्टी घराघरापर्यंत पोहोचवून अरविंद केजरीवाल यांचं बघितलेले स्वप्न आम्ही सर्व कार्यकर्ते पूर्ण करून दाखवू असा निर्धार केला!
महाराष्ट्राबद्दल केलेल्या स्वराज्य स्थापनेचं स्वप्न बेरोजगार मुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचार मुक्त, घुसखोरी मुक्त, कट्टर इमानदार महाराष्ट्र, घडवण्यासाठी आरोग्य सेवा, शिक्षण, वीज, पाणी, रोजगार, या सर्वांचा विचार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला असून, आपल्या सर्वांचा स्वप्नांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून नक्कीच बदल घडवून, महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेत जास्तीत जास्त जागा जिंकून दाखवू असा निर्धार देखील करण्यात आला. अशी माहिती अमळनेर आप च्या सूत्रांनी दिली आहे!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button