Maharashtra

मंगेश दादा चव्हाण मित्र परिवाराचा सामाजिक भान जपणारा उपक्रम वंचित दुर्लक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

मंगेश दादा चव्हाण मित्र परिवाराचा सामाजिक भान जपणारा उपक्रम

 वंचित दुर्लक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

मंगेश दादा चव्हाण मित्र परिवाराचा सामाजिक भान जपणारा उपक्रम वंचित दुर्लक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप


चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
विद्यार्थी हा विद्यार्थीच असतो त्याला कुठल्याही जाती, धर्मा पंथांमध्ये बंदिस्त न करता विद्यादानाचे काम शिक्षक करत असतात. मात्र कधी परिस्थितीमुळे, आर्थिक अडचणींमुळे काही शैक्षणिक साहित्य गरीब – वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येत नाही. या सामाजिक प्रश्नातून  मार्ग काढण्यासाठी मंगेश दादा चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने आज राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयाजवळ सिग्नल पॉईंट येथे, गरीब-गरजू विद्यार्थ्यांना ज्यांच्या पाठीवर दप्तर नाही किंवा ज्यांचे दप्तर फाटलेले आहे अशा विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. शाळेत ये-जा करण्यासाठी पाठ्यपुस्तक, वह्या, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य हाताळण्यासाठी दप्तराची गरज खूप आहे. ही गरज लक्षात घेऊन हा सामाजिक उपक्रम आज राबविण्यात आला. मंगेश दादा चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने कुणाल तांबे, प्रवीण मराठे,  संदीप पाटील, किरण मांडोळे, नितीन चौधरी, जितेंद्र पाटील, दीपक महाजन, आबा चौधरी, अतुल शिनकर व इतर कार्यकर्त्यांच्या हातून हे सामाजिक कार्य पार पडले. दप्तर घेऊन जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान होते, आनंद होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद टिकवणे, त्यांना वाढवत नेणे, तालुक्यातील प्रत्येक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर पोहचविण्याचा संकल्प हेच मंगेश दादा चव्हाण मित्र परिवाराचे सामाजिक दायित्व आहे.

मंगेश दादा चव्हाण मित्र परिवाराचा सामाजिक भान जपणारा उपक्रम वंचित दुर्लक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button