Faijpur

नाहाटा महाविद्यालयात रासेयो एककातर्फे ” गोवा मुक्ती दिन” उत्साहात साजरा

नाहाटा महाविद्यालयात रासेयो एककातर्फे ” गोवा मुक्ती दिन” उत्साहात साजरा

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

येथील कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून *गोवा मुक्ती दिन* साजरा करण्यात आला .
19 डिसेंबर गोवा मुक्ती दिनाचे हीरक महोत्सवी वर्ष आहे. कारण गोवा मुक्ती ला साठ वर्षे पूर्ण झाले असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. आर .एस .नाडेकर हे होते, तसेच महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ममताबेन पाटील व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. विलास महिरे हे उपस्थिती होते.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेला वंदन करत केली. भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून देशभक्तीपर गीत घेण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. ममता बेन पाटील यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर यांनी “गोवा मुक्ती दिनच्या” निमित्ताने स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. गोवा मुक्ती संग्रामाची यशोगाथा स्पष्ट केले टीबी पुन्हा यांचे योगदान स्पष्ट केले राष्ट्रीय संघटनात्मक दृष्टिकोनातून या विविध घटनांचा मोलाचा हातभार आहे. राष्ट्राच्या एकता आणि अखंडता तिच्या दृष्टीने विविध संस्थां नानांचे विलीनीकरण हा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. भारतीय स्वातंत्र्याची 75 री साजरी करताना भारताच्या युवा पिढीने या गौरवशाली इतिहासाला कायम स्मरणात ठेवणे महत्त्वाचे आहे, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रासेयो चे स्वयंसेवक आकाश बावस्कर यांनी केले. कुमारी, वैष्णवी ठाकूर यांनी सुंदर असे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला रासेयोचे विविध स्वयंसेवक उपस्थित होते. गायत्री बजाज, वैष्णवी ठाकूर, संजना दुधानी, कल्याणी पराळे ,जयश्री पाटील, आदित्य हिवरे, स्वप्निल डोळसे,विक्रांत रोडे, खुशाल मानकर, आकांशा चांदेकर ,तारकेश्वरी सोनवणे, सागर सोनवणे, हर्षल चव्हाण, गोपाळ रंदाळे, चेतना पाटील, निकिता बोरसे ,अमोल सुरडकर, इत्यादी. यांसारखे विविध विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी. एच. बऱ्हाटे, व डॉ. एन. ई. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button