Pune

स्टार्टअप्सद्वारे युवा आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणार – कु. अंकिता पाटील

स्टार्टअप्सद्वारे युवा आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणार – कु. अंकिता पाटील

दत्ता पारेकर पुणे

पुणे : पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी राज्यसभेच्या खासदार सौ. प्रियंका चतुर्वेदी यांची काल मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
सौ प्रियंका चतुर्वेदी व कु.अंकिता पाटील या एक कणखर युवा महिला राजकारणी म्हणून परिचित आहेतच त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सौ प्रियंका चतुर्वेदी या दोन स्वयंसेवी संस्थांच्या विश्वस्त आहेत व अंकिता पाटील या एक प्रसिद्ध युवा नेत्या आहेत. त्या विविध स्टार्टअप्सद्वारे युवा आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत.
येणार काळात आपल्या भागात ही जिल्हा परिषद व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि आरोग्यास प्रोत्साहन देण्याचे काम करता येईल, या बाबत ही प्रसंगी चर्चा केली असे कु.अंकिताताई हर्षवर्धनजी पाटील यांनी सांगीतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button