Nashik

नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा रोड येथे गाडीने घेतला पेट..

नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा रोड येथे गाडीने घेतला पेट..

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा रोड येथे आज रोजी पिंपळगाव
व हद्दीत मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर नाशिक ते पिंपळगाव लेन वर साकोरे फाट्याजवळ सियाज क्रमांक MH15 FN 4177हिने 11.50 वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने सेंट्रल लॉक सिस्टिम ऍक्टिव्हेट झाल्याने चालक नामे संजय चंद्रभान शिंदे वय 55, राहणार साकोरे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक यांना वाहना बाहेर येता न आल्याने,वाहनांमध्ये अडकून सुमारे 75 ते 80 टक्के भाजल्याने जागीच मयत झाले. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ अपघातस्थळी रवाना होऊन फायर ब्रिगेड यांना पाचारण करून आग विझविण्यातआली. तसेच महामार्गावर दुतर्फा थांबलेली वाहने व बघ्यांची गर्दी मार्गस्थ करून, दरम्यानच्या काळात संपूर्ण वाहतूक विरुद्ध बाजूने वळविण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांनी स्पॉटवर येऊन P.M केले. अपघातग्रस्त वाहन हे पिंपळगाव टोल कडील क्रेनने पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेले आहे.स्थानिक आमदार श्री. दिलीपराव बनकर हे ही घटनास्थळावर उपस्थित होते. संपूर्ण कारवाई दरम्यान रहदारी नियमन करण्यात आले. पुढील कायदेशीर कार्यवाही पिंपळगाव पोस्ट कडील उपनिरीक्षक श्री चौधरी व कर्मचारी करीत आहेत.
अपघात माहिती मिळाली 12.00
रवाना 12.00
पोहोचलो 12.05
कारवाई संपली 13.45
माहितीस्तव सविनय सादर
सपोनि वर्षा कदम
मपो केंद्र पिंपळगाव

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button