Motha Waghoda

कर्जोद येथे कोरोना विषयक जन जागृती आणि रुग्ण शोध शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद ६५२ नागरिकांची तपासणी

कर्जोद येथे कोरोना विषयक जन जागृती आणि रुग्ण शोध शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद ६५२ नागरिकांची तपासणी

मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालय व अलफैज फौन्डेशन जळगाव यांचा संयुक्त कार्यक्रम

प्रतिनिधी मुबारक तडवी

तालुक्यात कोरोना आपला प्रादुर्भाव पसरवित असून त्याचेवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी असा संभ्रम नागरिकांमध्ये असून मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि भीती असल्याने कर्जोद येथे अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय आणि अलफैज फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गावासाठी रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात कोरोना योद्धे यांचा गौरव करून नागरिकांची तपासणी करून भीती कमी करण्यात आली.

शिबिराचे अध्यक्षस्थानी अ. करीम सालार हे होते तर उद्घाटन उप विभागीय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख उपस्थीत वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपम अजलसोंडे, आरोग्य निरीक्षक महेमूद तडवी, सरपंच साकीना तडवी केंद्र प्रमुख रईसोद्दिन अलाउद्दीन, श्रीराम फौन्डेशन सचिव दीपक नगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलफैज फाउंडेशनचे अध्यक्ष अ. अजीज सालार यांनी केले. रुग्ण तपासणी कक्षाचे उद्घाटन अ.करीम सालार यांच्या हस्ते तर औषधालयाचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना डॉ श्री थोरबोले यांनी सांगितले की, कोरोनाला आपण घाबरू नका त्याच्या सोबत आपल्याला जगायचे असून आपल्या घरातील संशयित रुग्णांना आपण आरोग्य यंत्रणे पर्यंत पोहचवून त्यांना उपचारासाठी संधी मिळवून द्या. डॉ करीम सालार व अ माजिद सालार यांच्यासंस्था जिल्ह्यात अत्यंत चांगले काम करीत असून अश्या प्रकारचे शिबीर गावोगावी होणे आवश्यक असून फैजपूर येथील कोविड सेंटर अत्यंत प्रभावी काम करीत असून आज पर्यंत सुमारे ५०० रुग्ण याठीकानाहून बरे होऊन घेरी गेले आहेत, अभिमानाची बाब यात एकही रुग्ण दगावलेला नाही. सामाजिक संस्था आणि पदाधिकारी यांनी अशीच सेवा बजावून नागरिकांना समुपदेशन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

अ. करीम सालार यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, सर्व प्रथम आपण आपली काळजी घेणे आवश्यक आहे. मालेगाव धर्तीवरील काढा आमची संस्था विकसित करण्यात येत असून लवकरच नागरिकांच्या सेवेत तो वितरीत करण्यात येईल. कोरोनाला आपण घाबरू नका केवळ काळजी घेवून आपली सुरक्षितता आपण निश्चित करू शकतो. नागरिकांना कुठलाही त्रास झाल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेकडे जाण्याचे देखील त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शे. शकील यांनी मानले. रुग्ण तपासणीसाठी डॉ हनीफ शेख, डॉ अनुपम अजलसोंडे, सोहेब शेख, डॉ जावेद देशमुख, डॉ अशफाक कादर, डॉ अमीर सालार, डॉ मुजीब पिंजारी, डॉ अब्दुल वहाब, डॉ अनिल पाटील यांचेसह सहकारी यांनी तपासणी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शकील शेख, हाजी सरफराज शेख, शशफीउद्दीन शेख,शरीफ शेख, जमील शेख , मनोज पाठक, आशिष पाठक , मैरुद्दीन शेख, रईस शेख, इकबाल शेख, ताजु उस्ताद, अब्दुल्लाह एम आर, वसीम शेख, अल्ताफ मान्सूरी आदींनी परिश्रम घेतले.

मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय कर्जोद तर्फे करोना योद्धे यांचा गौरव –

रावेर तालुक्यात कोरोना विरुद्ध लढा लढणारे आणि कर्जोद परिसरातील रुग्णांच्या हितासाठी लढणाऱ्या योध्यांचा गौरव संस्थे मार्फत करण्यात आला यात प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, अलफैज फौन्डेशन अध्यक्ष करीम सालार, तहसीलदार अभिलाषा देवगुणे, गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, डॉ चंद्रकांत पाटील, डॉ अनुपम अजलसोंडे, डॉ एल जे शेख, डॉ हनीफ शेख, सौ के डी नगरे, आरोग्य पर्यवेक्षक महेमूद तडवी, ग्रामसेवक संजय महाजन, अ. अजीज सालार, आशावर्कर सौ नंदा श्रीनामे, सविता महाजन, सविता बारी, केंद्रप्रमुख रईसोद्दिन शेख, पोलीस पाटील अमोल महाजन, कोतवाल रवींद्र श्रीनामे, मलक मुदस्सर, शे. जावेद, सुरेश मेहतर, शरीफोद्दीन शेख यांचा समावेश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button