Pandharpur

प्रवाहाच्या विरोधात होडी चालवत १२ जणांना काढले पाण्याबाहेर भटुंबरेच्या तरुणांनी केले धाडसी कार्य..

प्रवाहाच्या विरोधात होडी चालवत १२ जणांना काढले पाण्याबाहेर भटुंबरेच्या तरुणांनी केले धाडसी कार्य..

पंढरपूर प्रतिनिधी / रफिक अत्तार

पंढरपूर शहराच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या अहिल्यापुलनाजीकच्या देवगड मठात पाण्याच्या विळख्यात अडकून पडलेल्या १२ जणांची प्रवाहाच्या विरुद्ध तब्बल एक किलोमीटर होडी चालवत बबलू प्रक्षाळे व त्याच्या काही मित्रांनी सुखरूप सुटका केली.यामुळे तरुणांच्या धाडसाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की
काल सकाळी पंढरपूर शहराच्या विरुद्ध भागास असणाऱ्या भटुंबरे गावातील खांडेकर वस्ती शेजारील देवगड मठ याठिकाणी व त्या शेजारील दोन मठामध्ये जवळजवळ बारा लोक पाण्यामध्ये अडकले असल्याचे ग्रामवसेवकांना कळाले होते. त्यामुळे त्यांनी तलाठी राऊतसाहेब यांना फोन केला.तसेच भटुंबरे गावचे ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब त्याचबरोबर आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून सतत काम करणारे पोलीस पाटील अनिल पाखरे यांना वरील मठामध्ये दहा ते बारा लोक अडकल्याची माहिती दिली.त्यावेळी भटुंबरे गावातीलच तरुण बबलू प्रक्षाळे यांच्याकडे लाकडी होडी असल्याचे समजले. त्यामुळे ग्रामसेवक,रावसाहेब व तलाठी, पोलीस पाटील यांना माहिती देऊन बबलू यास बोलण्यास सांगितले.सर्वांनी बबलू यास बोलल्यानंतर लगेचच स्वयंस्फूर्तीने आम्ही अडकलेल्या लोकांना बाहेर काढतो असे म्हणून बबलू प्रक्षाळे व त्याचे तीन मित्र सूरज रायजादे,विशाल मेटकरी,साजन माने यांनी तयारी दर्शवली.मात्र गावापासून मठाचे अंतर साधारणपणे एक किलोमीटर असले तरी नदीचा प्रवाह वेगात असल्याने व होडीला इंजिन नसल्याने हाताने होडी चालवत घेऊन जाणे अतिशय जिकिरीचे काम होते मात्र आपल्या जिवाची पर्वा न करता नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेला आपली हाताने लाकडी दांड्याच्या साहाय्याने जवळजवळ एक किलोमीटर अंतर उलट प्रवास करून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला मठापर्यंत होडी पोहोचवली. तसेच मठामध्ये अडकलेल्या 12 लोकांना बाहेर काढण्यास मोठी मदत करून सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढले.त्याच बरोबर ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब यांनीदेखील लोकांना बाहेर काढण्यासाठी स्वतः हजर राहत मोलाची साथ दिली. त्यामुळे सर्व तालुकाभरात बबलू प्रक्षाळे व त्याच्या मित्रांचे कौतुक केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button