Nashik

कालवा सल्लागार समिती बैठकीस खा.डॉ.भारती पवार यांची उपस्थिती

कालवा सल्लागार समिती बैठकीस खा.डॉ.भारती पवार यांची उपस्थिती

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे पालकमंत्री मा.ना.श्री.छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित गंगापूर, कडवा, पालखेड, ओझरखेड, चनकापुर प्रकल्पाची सल्लागार समिती बैठक संपन्न झाली. सदर बैठकी दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदार संघातील कालव्यांसंदर्भात अधिक माहिती जाणून घेत ज्या भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते त्या भागात वाढीव आवर्तने देण्याची मागणी खा.डॉ.भारती पवार यांनी केली. सदर कालवा सल्लागार समिती बैठकीस पालकमंत्री मा.ना.श्री.छगन भुजबळ, खा.डॉ.भारती पवार, मा.आ.श्री.दिलीप बनकर, मा.आ.श्री.राहुल आहेर, पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी श्रीराम शेटे, मा.श्री.नितीन पवार, जिल्हाधिकारी श्री.सूरज मांढरे, मनपा आयुक्त मा.श्री.कैलास जाधव, मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, मा.जिल्हा कृषी अधीक्षक पडवळ, औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, सर्व प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, मालेगाव चानकापुर कालव्याचे मुकुंद चौधरी, राकेश गुजरे आदी अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button