Maharashtra

शेतात कामाला गेलेल्या युवकाचा शॉक लागल्याने मृत्यू सडावण गावात शोककळा

शेतात कामाला गेलेल्या युवकाचा शॉक लागल्याने मृत्यू
सडावण गावात शोककळा

शेतात कामाला गेलेल्या युवकाचा शॉक लागल्याने मृत्यू सडावण गावात शोककळा

सडावण ता. अमळनेर :- येथील सागर अशोक पाटील ह्या २३ वर्षीय युवकाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सदर युवक हा स्वतःच्या शेतात कामासाठी गेला असता.  दुपारी पाऊस सुरू झाला.  व त्याचे कपडे ओले झाले. तो त्याच्या शेतातील एका लाईटच्या खांबाजवळ उभा असा त्याला शॉक लागला.  हे शेतात असलेल्या त्याच्या आई व वडील यांना समजले असता त्यांनी लगेच खासगी वाहनात त्याला टाकले व अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.  मात्र त्यास तेथुन ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे हलवण्यात आले.  तेथे त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button