? Breaking…मुंबईत पावसाला सुरुवात पुढील चार दिवस धोक्याचे…..
पी व्ही आनंद मुंबई
मुंबई : मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला. या साऱ्याचा परिणाम आजपासूनच मुंबईतील अनेक भागात जाणवू लागला आहे.मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सकाळपासूनच बरसत आहे. दक्षिण मुंबई पूर्व उपनगर पश्चिम उपनगर या भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून जोरदार पाऊस बरसत होता.
आता काही पावसाने विश्रांती घेतली आहे. मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांची काही काळ तारांबळ उडाली. मुंबई मध्ये सध्या ढगाळ वातावरण सर्वीकडे दिसत आहे. यामुळे काळोख देखील निर्माण झाला आहे. मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीवर काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागा जवळील नवी मुंबई, रायगड, ठाणे या भागात देखील ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईच्या काही ठिकाणी जोरदार पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली आहे. अजून मुंबईकरांना चार दिवस काढायचे आहेत कारण की पुढील चार दिवस ही मुंबईकरांसाठी धोक्याचे आहेत. हवामान विभागाकडून कालच मुंबईसह जवळील भागात अतिवृष्टी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या काळात 300 मिलिमीटरहून जास्त पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.






