Amalner

अमळनेर: एसटी संप..!पारोळ्याला जाणाऱ्या बसवर दगडफेक..!

अमळनेर: एसटी संप..!पारोळ्याला जाणाऱ्या बसवर दगडफेक..!

अमळनेर येथील बस कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. हा संप दडपून टाकण्यासाठी विविध उपाययोजना शासनाकडून राबविण्यात येत आहे. यात बडतर्फीची भिती, कुटुंबाची बिघडत चाललेली आर्थिक स्थिती, दडपण,तणाव इ मुळे बस चालक प्रविण पाटील यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. ह्या घटनेनंतर प्रवीण च्या पत्नीने ठोस भूमिका घेत जोपर्यंत पती बरा होऊन घरी येत नाही तोपर्यंत एकही बस
आगाराबाहेर जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.
परिणामी पारोळा येथे एक बस क्र MH 40,N- 9082 रवाना झाली. पण ह्या बस वर रत्नापिंप्री येथे दगडफेक झाली. यात काच फुटून चालक रवींद्र पाटील यांच्या हाताला जखम झाली आहे. बस पारोळा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button