कापुतळणी मधील दोन गणेश मंडळाचे प्रशासनाने कोरोना योद्धा म्हणून केला सत्कार…
महेंद्र भगत
अंजनगाव सुर्जी
तालुका प्रतिनिधी
कोरोना महामारी च्या परिस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्येक्ती जवळ जाण्याची हिम्मत कोणी करत नाही शीवाय डॉक्टर व मेडिकल स्टाफ सोडून तर इतकेच काय घरातील परिवारातील नागरिकही या महामारी मुळे दुरावले. परंतु या महामारी ला न भिता स्वतः ची सुरक्षा ठेवत कोवीड 19 ला लढा देणाऱ्या रुग्णांच्या पाठीशी असे अनेक कोरोना योद्धा तयार होऊन खंबीर पणे उभे झाले की त्यानीं स्वतः चा जीव धोक्यात घालून या महामारीत आपापले कर्तव्य पार पाडले व आपली सेवा त्या रुग्णांसाठी दिली.
असेच सेवा भाव ठेवत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी गावा मधील हनुमान गणेश मंडळ व जय किसान गणेश मंडळ या दोन्ही मंडळानी कोरोना संसर्ग आजारा बाबत रक्तदान शिबीर आयोजित केले होते या सामाजिक कार्य आणि निःस्वार्थ सेवाभाव कार्याबद्दल तसेच प्रशासनास सहकार्य केल्यामुळे त्यांची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अंजनगाव सुर्जी अमरावती ग्रामीण दोन्ही मंडळाचा डॉ. हरी बालाजी एन (भा.पो.से.)श्याम गुघे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण सोमय मुंडे (भा.पो.से.)सहा. उपविभाग अंजनगाव सुर्जी अमरावती ग्रामीण तसेच अंजनगाव सुर्जी चे तहसीलदार विश्वनाथ गुघे यांच्या तर्फे दोन्ही मंडळाला सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
