Chandwad

शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह , चांदवड येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह , चांदवड येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

उदय वायकोळे चांदवड

०९ आॉगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिना निमित्त शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह , चांदवड येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने भगवान एकलव्य व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे प्रतिमा पूजन करत आदिवासी दिन साजरा केला.
यावेळी अश्विनी हिंगले व ज्योती बागुल या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. आदिवासी गौरव दिन का साजरा करायचा या विषयावर निलेश गुलाब चौरे या विद्यार्थ्याने भाषण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री भुषण कासलीवाल यांनी भुषविले व भाजपा आदिवासी मोर्चा चे तालुकाध्यक्ष संजय पाडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुलांच्या वसतीगृहाचे अधिक्षक श्री हितेंद्र राठोड यांनी देशभक्ती पर गीत सादर केले. मुलींच्या वसतीगृहाच्या अधिक्षक सौ. स्वप्नाली पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

याप्रसंगी भुषण कासलीवाल , संजय पाडवी , प्रशांत ठाकरे , मत्छींद्र गांगुर्डे , मुन्ना मोरे , महेश खंदारे , मुकेश आहेर , विशाल ललवाणी , संकेत वानखेडे , नितीन फंगाळ आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थी निलेश चौरे व अश्विनी हिंगले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button