sawada

सावदा पालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या कामाची चौकशी करा : अन्यथा गणतंत्र दिनाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार! सत्ताधारी नगरसेविकेनेच केली तक्रार

सावदा पालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या कामाची चौकशी करा : अन्यथा गणतंत्र दिनाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार! सत्ताधारी नगरसेविकेनेच केली तक्रार

युसूफ शाह सावदा

सावदा : येथील नगरपालिकेतील आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून काम केलेले, महेश चौधरी यांनी केलेल्या विविध कामांची चौकशी करण्याची तक्रार मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. चौकशी न केल्यास येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी दिला आहे. परिणामी सत्ताधारी गटातून पालिकेचे वाभाडे काढले जात असून, एक प्रकारे घरचा आहेर दिला जात असल्याने खळबळ उडाली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य अधिकारी महेश चौधरी हे नगरपालिकेत वाचमन पदावर लागल्या पासून, इतर जेष्ठ कर्मचारी असतांना 2-3 वेळा पदोन्नती कशी देण्यात आली? ते 60%टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असून नोकरीत लागले पासून, आजपर्यंत किती प्रवास भत्ता घेतला आहे.? जर नियमांचे उल्लंघन करून भत्ता घेतला असेल तर तो त्यांचेकडून वसुल करण्यात यावा. चौधरी यांनी न पा हद्दीतील मालमत्ता धारकांच्या घरी सौच्यालय असताना, सौच्यालय बांधण्यासाठी अनुदान दिल्या ची चौकशी करावी. सन 2011-2012 संपूर्ण वर्षभरात झालेला डिझेल खर्च किती? तसेच सन 2011 – 2012 मध्ये न पा हद्दीत सफाई व्हॅक्यूम च्या किती पावत्या फाडलेल्या आहेत? त्यावर डिझेल साठी झालेला खर्च किती आहे? यासर्व प्रकाराची लवकरात लवकर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अन्यथा येत्या गणतंत्र दिनाला 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या बाबतची निवेदन मा. आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव,जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button