Rawer

जिल्हास्तरीय उत्कृष्ट केंद्रप्रमुख पुरस्काराने फिरोज तडवी सन्मानित विशेष …गौरव ! कोरोना काळात शाळेत राबविलेले सुंदर उपक्रम, ‘सुंदर माझी शाळा’ या उपक्रम मुळे मिळाला पुरस्कार

जिल्हास्तरीय उत्कृष्ट केंद्रप्रमुख पुरस्काराने फिरोज तडवी सन्मानित विशेष …गौरव ! कोरोना काळात शाळेत राबविलेले सुंदर उपक्रम, ‘सुंदर माझी शाळा’ या उपक्रम मुळे मिळाला पुरस्कार

मुबारक तडवी रावेर

रावेर : रावेर येथिल रहिवासी असलेले अजिंठा केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांना जिल्हास्तरीय आदर्श उत्कृष्ट केंद्रप्रमुख विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते त्यांना शुक्रवारी पुरस्कार देऊन सपत्नीक गौरविण्यात आले.
अजिंठा केंद्रामध्ये आपल्या कल्पकतेतून शालेय सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने प्रत्येक उपक्रम यशस्वीरित्या राबवून केंद्रातील प्रत्येकच शाळा,शैक्षणिक, भौतिक, सामाजिक अशा प्रत्येक क्षेत्रात विकसित होण्यासाठी व अग्रेसर राहण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले उपक्रमशील केंद्रप्रमुख, काम करण्याची आणि करवून घेण्याची विलक्षण हातोटी असलेले आदर्श केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांचे कौतुक होत आहेत. आपल्या कार्यप्रति असलेली निष्ठा,ध्यास, सचोटी, सातत्य आणि प्रामाणिकपणा यासह त्यांचेकडून निरंतर आणि अखंडितपणे घडत असलेले त्यांचे अमूल्य कर्तृत्व याची पावतीच या पुरस्काराच्या रूपाने एकूणच आदर्शवत असलेले अभ्यासू, कार्यतत्पर, सहकार्य वृत्तीचे व्यक्तिमत्व आम्हा सर्व शिक्षकांसाठी नेहमी अतिशय प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले आहे. आदरणीय तडवी सरांचे हे अमूल्य कार्य सदोदित अश्याच कार्यकुशलतेने निश्चितपणे सुरूच राहील, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा शिक्षकांनी, ग्रामस्थांनी दिले. या पुरस्कारच्या वेळेस जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, शिक्षण सभापती अविनाश गलांडे, बांधकाम सभापती किशोर बलांडे, महिला बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, रामुकाका शेळके, पुष्पा काळे, आशिविनी लाटकर, राकेश साळुंके, प्रियाराणी पाटील, रमेश ठाकूर, प्राथमिक शिक्षणा अधिकारी सूरज प्रसाद जैस्वाल, माध्यमिक शाळेचे शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण, शि.वि.अ.श्री.सिरसाट साहेब उपस्थित होते. या पुरस्कार बद्दल मा.गटशिक्षणाधिकारी व्हि.एन कोमटवार साहेब शि.
वि.अ.श्री डि.टि सिरसाठ साहेब मुख्याध्यापक घोरपडे सर,आसेम अध्यक्ष राजु तडवी. मा.सरपच संजु जमादार मुखाध्यापीका शेख जमीला, शिक्षक अभय हिवाळे, अनिल परसे, दिलीप गुप्ता, नसिर सर आदींनी फिरोज तडवी यांचे अभिनंदन केले.

चोकट… जिल्हा परिषद आपल्या हद्दीतील २५ शाळांचे मूल्यमापन, परिसर वृक्ष लावून सुशोभीकरण, डिजिटल वर्ग, शाळेची भिंती बोलक्या रंगाने सजवणे आदी उपक्रम केंद्रप्रमुख फिरोज तडवी प्रामाणिक पणे पार पाडतात. सद्या त्यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद च्या पहिली वर्गाचे शंभर टक्के प्रवेश केले. विद्यार्थी पालक जिल्हा परिषद कडे कसे आकर्षित होईल त्यांना प्रायव्हेट शाळेसारखे शाळा जिल्हा परिषद त्यांनी बनविले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button