Amalner

Amalner:खरीप हंगाम कापूस पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी आप चे धरणे आंदोलन…

Amalner:खरीप हंगाम कापूस पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी आप चे धरणे आंदोलन…

विषय:सन २०२१-२२ मधील खरीप हंगाम कापूस पीक विमा राहिलेली 75% जोखीम स्तर नुकसान भरपाई रक्कम मिळणेबाबत.
तसेच सन २०२१ अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळणे बाबत. आम आदमी पार्टी तर्फे अमळनेर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आज रोजी या ९/ ५/२०२२ सोमवार सकाळी दहा वाजेपासून आंदोलनाला सुरुवात झाली.
विषय तालुक्यातील सन २०२१-२२ च्या खरीप हंगामात अगदी सुरुवातीला दोन अडीच महिने नगन्य अत्यल्प पाऊस पर्जन्यमान झाले. त्यानंतर दोन वेळा अतिवृष्टी झाली या अशा दुहेरी संकटा मुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेलेला आहे. आर्थिक विवंचनेत अडकलेला आहे हे आपणा सर्वांना ज्ञात आहेत. विमा जोखीम 25% अग्रीम रक्कम पाच ते सहा महिन्यापूर्वी मिळाले परंतु आत्ता एप्रिल महिना संपून गेला तरी कापूस पीक विमा ची राहिलेले उर्वरित 75 % रक्कम नुकसान भरपाई मिळाली नाही. 75% उर्वरित रक्कम त्वरित मिळावी तसेच सन. २०२१ मधील खरीप हंगाम अवकाळी व अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वाटप व्हावे.

यासाठी आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा भर प्रत्येक तहसील कार्यालयासमोर दि.०९/०५/२०२२ वार सोमवार रोजी सकाळी दहा वाजेपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.
अमळनेरचे नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी शासनाच्या वतीने दखल घेऊन आम्ही आपले शेतकरी संदर्भातील सर्व विषय शासनास कळवितो असे आश्वासन देऊन. आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील व संपूर्ण कार्यकर्त्यांसोबत शब्द दिला की प्रांत, तालुका कृषी अधिकारी,तहसीलदार,तसेच आम आदमी पार्टी अमळनेर चे पदाधिकारी यांच्यासोबत मीटिंग घेऊ अशी ग्वाही दिली.
आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष बाबुराव पाटील, सचिव नाना अभिमन पाटील, मार्गदर्शक डॉ. रुपेश संचेती,शेतकरी नेते नानासो शिवाजी दौलत पाटील, राजेंद्र गुलाब पाटील. रियाज बागवान. ज्येष्ठ दिलीप बाबुराव पाटील मारवड. आप्पा दाभाडे,रवींद्र भरत पाटील झाडी,पत्रकार धनंजय सोनार, संजय जैन चौबारी, शिवराम पाटील पळासदडे.,लोटन सहादु पाटील, पिरण घुमान पाटील,रवींद्र किसन पाटील सुंदरपट्टी,भास्कर पोपट पाटील हेडावे इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button