Nashik

चिंचखेड येथे कोविंड लसीकरणाचा शुभारंभ…

चिंचखेड येथे कोविंड लसीकरणाचा शुभारंभ…

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथे गुरुवार दिनांक 22 एप्रिल सकाळी दहा वाजता खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी मा.डॉ. निलेश बेडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचखेड येथील उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
चिंचखेड व परिसरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन येथील जेष्ठ नागरिक महिलांना इतरत्र लसीकरणासाठी जावे लागत होते ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. भास्करराव भगरे सर ,डॉक्टर योगेश गोसावी व श्री.शिवानंद भाऊ संधान यांच्या प्रयत्नातून व चिंचखेड ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे आज प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली.
चिंचखेड येथे कोरोना ची वाढती रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे अनेक नागरिक कोरणा संक्रमित होत आहेत .या संक्रमणाचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून लसीकरण अभियान देशभरात राबवले जात आहे जेणेकरून प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झाले पाहिजे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे व आपली सुरक्षितता वाढावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्रामपंचायत,आरोग्य विभाग,दैनिक सकाळचे पत्रकार श्री.योगेश भाऊ मेधणे ,दैनिक देशदुतचे पत्रकार श्री.तुषार भाऊ झेनफळे व सरकारी यंत्रणा यांनी जनजागृती करून कोरोना १९ चा प्रतिबंध कसा होईल याकरिता ते अथक प्रयत्न करीत आहेत.व नागरिकांनी गर्दी न करता संपूर्ण कोरोना चे नियम पाळून आरोग्य उपकेंद्रात यावे तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी गर्दी न करता आपले आधार कार्ड घेऊन यावे लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. सदर लसीकरण प्रसंगी चिंचखेड गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.मीनाक्षी ताई गुबांडे, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.विजय पाटील, सुभाष मातेरे,शिवानंद संधान, दत्तात्रय संधान, विलास गुबांडे, ग्रामविकास अधिकारी श्री.नानासाहेब तांबे ,आरोग्य कर्मचारी डॉ. वाळूंज व त्यांच्या आरोग्य सेविका, अंगणवाडी कर्मचारी सौ.मीना पाटील, सुनिता साबळे,सुनिता झेंडे, संगिता मोरे व आशा सेविका उषा कांबळे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button