Bollywood

?️ ह्या बॉलिवूड कलाकारांच्या मृत्यूचे रहस्य आजही उलगडले नाही…

?️ ह्या बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मृत्यू चे रहस्य आजही उलगडले नाही…

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत ह्याने १४ जूनला दुपारी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. तर सुशांतच्या निधनापूर्वी त्याची एक्स मॅनेजर २८ वर्षीय दिशा सालियन हिने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

याअगोदर सुद्धा अनेक बॉलिवूड कलाकारांचे मृत्यु अश्याच रहस्यमय परिस्थितीत झाले आहेत. कोण आहेत बॉलिवूड कलाकार…ज्यांनी अचानक यशाच्या शिखरावर असताना मृत्यू आला..यातील काही मृत्यू हे आत्महत्या आहेत तर काही रहस्य मय मृत्यू आहेत.या कलाकारांच्या मृत्यू चे रहस्य आजही बॉलिवूडच नव्हे तर संपूर्ण जगातील चाहत्यांना उलगडले नाही

दिव्या भारती

सर्वात सुंदर आणि अप्रतिम अभिनेत्रींपैकी एक दिव्या भारती हिचा मृत्यु सुद्धा रहस्यमय पद्धतीने झाला होता. दिव्याचा मृत्यु ती केवळ १९ वर्षाची असताना झाला होता. पोलिसांना तपासानुसार ज्या रात्री दिव्याचा मृत्यु झाला होता, त्याच रात्री ती नशेमध्ये होती आणि पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. परंतु आजही दिव्याचा पती साजिद नाडियाडवाला वर शंका घेतली जाते.

परवीन बाबी

एकेकाळची सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री परवीन बॉबीला स्किज़ोफ्रोनिया नावाचा एक गंभीर आजार होता. २२ जानेवारी २००५ ला परवीनचा मृतदेह तिच्या मुंबईतील फ्लॅट मध्ये मिळाला. परवीन बॉबीच्या मृ त्यूवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. पोस्टमोर्टम रिपोर्ट मध्ये सांगितले गेले कि परवीनचा मृत्यू भूखेमुळे झाला, कारण तिला गँगरीन आणि मधुमेह ह्यासारख्या गंभीर आजार होते.

जिया खान

प्रतिभावंत आणि सुदंर अभिनेत्री जिया खानने केवळ २५ व्या वर्षी आपल्या फ्लॅट मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यू नंतर जिया खानच्या आईने जियाच्या मृत्यु साठी तिचा बॉयफ्रेंड सुरज पांचोली ह्याच्यावर आरोप लावले होते. जिया खानचा मर्डर होता कि आत्महत्या, हे आजदेखील एक रहस्य आहे.

श्रीदेवी

२४ फेब्रुवारी २०१८ ला लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवीच्या अचानक मृत्यूची बातमी समोर आली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. श्रीदेवी दुबई मध्ये एक लग्नसमारंभात भाग घेण्यास गेली असता वॉशरूममध्ये बाथटब मध्ये बुडल्यामुळे तिचा मृत्यु झाला. हे अविश्वसनीय होते कि खरंच बाथटब मध्ये बुडल्यामुळे मृत्यु कसा काय होतो. ह्या पूर्ण घटनेमध्ये श्रीदेवी हीच पती बोनी कपूर ह्याच्यावर सुद्धा शंका उपस्थित केली जात होती. परंतु पोलिसांच्या तपासात बोनी कपूर ह्यांना क्लीन चीट मिळाली आणि श्रीदेवी ह्यांचा मृत्यु दुर्घटनापूर्ण बाथटबमध्ये बुडून झाल्यामुळे झाला होता असे स्पष्ट केले गेले.

प्रत्युषा बॅनर्जी

बालिका वधू मालिकेमधून आनंदीची भूमिका निभावणारी प्रत्युषा बॅनर्जी हीचा मृत्यू १ एप्रिल २०१६ ला झाला होता. प्रत्युषाने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रत्युषाच्या आईवडील आणि मित्रांनी तिच्या मृत्यूसाठी तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगला जबाबदार धरले. पोस्टमोर्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा सांगितले गेले कि, प्रत्युषाचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला.

मनमोहन देसाई

कुली, धरम-वीर, अमर अकबर ऍंथोनी सारख्या सुपरहिट चित्रपटांचे निर्देशक मनमोहन देसाई ह्यांचा मृ त्यूचे कारण आजपर्यंत कोणी जाणू शकले नाही. त्यांचा मृत्यु आत्महत्या होती कि दुर्घटना होती हि गोष्ट आजपर्यंत एक रहस्य बनून आहे. त्यांचा मृत्यू फ्लॅटच्या बाल्कनी मधून पडल्यामुळे झाला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button