Maharashtra

सरस्वती विद्या मंदीर शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा

 सरस्वती विद्या मंदीर शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा 

सरस्वती विद्या मंदीर शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा

अमळनेर
येथिल सरस्वती विद्या मंदीर शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानिमित्ताने विद्यार्थी,शिक्षकांसह जैन सोशल ग्रुपनेही तंबाखू मुक्ती ची शपथ घेतली.

सरस्वती विद्या मंदीर शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा
             स्वातंत्र्य दिवसानिमित्त सरस्वती विद्या मंदीर येथे मुख्याध्यापक रणजित शिंदे  यांनी स्वातंत्र्य दिवसाचे महत्व आणि बालहक्क याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
    *तंबाखू मुक्ती ची शपथ व खाऊ वाटप*
आज शाळेत विद्यार्थ्यांना ,व शिक्षकांना मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी शपथ दिली.याप्रसंगी जैन सोशल ग्रुप चे पदाधिकारी यांनीही तंबाखू मुक्त अभियानाची शपथ घेत आपला सक्रिय सहभाग नोंदविला. तर विद्यार्थ्यांना चॉकलेट, पेन्सिल,रबर,डायरी देत स्वातंत्र्य दिवस साजरा केला.
त्यावेळी अध्यक्ष महावीर संघवी,सचिन राजेश बेडमुथा, प्रदिप पारेख, रोटरी क्लब चे अध्यक्ष पूनम कोचर,सचिन पारेख,आदेश पारेख,धिरज कोचर आदि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता पाटील यांनी तर सूत्रसंचलन गीतांजली पाटील यांनी केले.आभार धर्मा धनगर यांनी व्यक्त केले.उपशिक्षक आनंदा पाटील, परशुराम गांगुर्डे, ऋषिकेश महाळपूरकर मदतनीस संध्या ढबु यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button