Bollywood

Bollywood: ह्या दिवशी प्रदर्शित होईल पठाण ओटीटी प्लॅटफॉर्मवर…ह्या प्लॅटफॉर्मवर असेल पठाण…!

Bollywood: ह्या दिवशी प्रदर्शित होईल पठाण ओटीटी प्लॅटफॉर्मवर…ह्या प्लॅटफॉर्मवर असेल पठाण…!

बॉलीवूडचा (Bollywood) सर्वात मोठा सुपस्टार शाहरुख खानने तब्बल चार वर्षानंतर ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं आहे. दीपिका पदुकोण आणि जॉन इब्राहिमचीही प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी 500 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. चित्रपटगृहांमध्ये ‘पठाण’ पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत असून शाहरुखच्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. असं असतानाच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येणार यासंदर्भातील उत्सुकताही चाहत्यांमध्ये आहे. पठाणच्या ओटीटी रिलीजसंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे.

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी दिर्दर्शित केलेला पठाण हा चित्रपट यशराज फिल्मच्या स्पाय युनीव्हर्सचा चौथा भाग आहे. एक था टायगर (2012), टायगर जिंदा है (2017) आणि वॉर (2019) या चित्रपटांनंतरचा हा चौथा चित्रपट आहे. पठाण चित्रपटामध्ये पठाण हा ‘रॉ’ म्हणजेच भारतीय गुप्तचर यंत्रणेचा माजी एजंट दाखवण्यात आला आहे. भारतावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या ‘आऊटफीट एक्स’ नावाच्या दहशतवादी संघटनेविरुद्ध लढण्याचे निर्देश पठाणला ‘रॉ’कडून दिले जातात. दीपिका पदुकोण ही पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेची एजंट दाखवण्यात आली असून ती पठाणला ‘आऊटफीट एक्स’विरोधात लढण्यासाठी मदत करते. या सर्व कथेमध्ये जॉन इब्राहिम हा ‘आऊटफीट एक्स’चा मोऱ्हक्या दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी हिंदी, तमीळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित झाला.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार ‘पठाण’चे ओटीटी रिलीजचे हक्क हे ‘अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’ला विकण्यात आले आहेत. ‘पठाण’च्या ओटीटी रिलीजचे हक्क खरेदी करण्यासाठी ‘अ‍ॅमेझॉन’ने तब्बल 100 कोटी रुपये मोजले आहेत.

हा चित्रपट डिजीटल माध्यमावर कधी प्रदर्शित करण्यात येणार यासंदर्भातील तारखेची घोषणा करण्यात आलेले नाही. काही वेबसाईट्सने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ‘पठाण’ चित्रपट तीन महिन्यानंतर ओटीटीवरुन प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. चित्रपट प्रदर्शनाला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर तो ओटीटीवर येईल असा अंदाज बांधला जात आहे. हे खरं ठरल्यास एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाहरुखच्या चाहत्यांना घर बसल्या ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर ‘पठाण’ पाहात येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button