Chalisgaon

अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांची मंगेश चव्हाण यांनी घेतली बैठक

अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांची आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली बैठक

मनोज भोसले

आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव कृषि विभागाचे तालुका कृषी अधिकारी साठे साहेब, कृषी सहाय्यक यांची बैठक आपल्या संपर्क कार्यालयात घेतली.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अश्या परिस्थितीत प्रशासनाने संपूर्ण ताकतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी केली असेल अश्या शेतकऱ्यांना पंचनामा, अर्ज सादर करण्यासाठी मदत करावी तसेंच विमा कंपनी सोबत समन्वय घडवून आणत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात यावी.
ज्यांचा पीकविमा नसेल त्यांचे रीतसर पंचनामे करण्यात येऊन तातडीने आपला अहवाल शासनाकडे सादर करावा असेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button