Amalner

? अमळनेर खुले करण्याच्या राजकीय तुघलकी निर्णयाच्या परिणामांना कोण राहणार जबाबदार?

? ठोस प्रहार चा दणका..अमळनेर खुले करण्याच्या राजकीय तुघलकी निर्णयाच्या परिणामांना कोण राहणार जबाबदार ?

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एकदम जोरात शहरात सुरू झाला होता. लॉक डावूनच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटी आणि तिसऱ्या टप्प्यात कोरोनाने जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने जन जीवन विस्कळीत झाले होते.जेमतेम परिस्थिती सुरळीत होत असताना आणि पुन्हा अमळनेर शहर खुले करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे. आता ह्या निर्णयाचे परिणाम काय होतील आणि त्याची जबाबदार कोणाची राहील? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

संकट कमी झालं असलं तरी टळलेलं नाही कारण परवा साने नगर येथील नवीन रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.या पार्श्वभूमीवर शहरात लॉक डाऊन सुरू असताना दुकानदार,व्यापारी यांनी नियम पाळले नाहीत.सर्व नियम धाब्यावर बसवून शासनाच्या नाकावर टिच्चून दुकाने उघडी ठेवली आणि भरमसाठ धंदा देखील केला.

आधीच सामान्य जनता राजकीय श्रेयवादाला कंटाळली आहे. कोव्हीड केअर सेंटरला गेले टाक फोटो..लाव बातमी (पैसे देऊन ??) नदीला आवर्तन सोडलं टाक बातमी टाका फोटो…हे कळतच नाही आहे की मग यांची जबाबदारी काय आहे? जे काम करत आहेत ते जनतेवर उपकार आहेत का? कर्तव्य म्हणून काम केले जात आहे का? आपत्ती व्यवस्थापन निधी प्रत्येक आमदारांना प्राप्त झाला आ असं माहीत पडलं आहे हे त्याच काय झालं? किती कसा आणि कुठे खर्च करण्यात आला? कर्तव्य पार पाडत आहेत मग शो बाजी फोटो बाजी, पेपरबाजी कशाला? तीही आपत्ती व्यवस्थापन काळात? जनतेची त्यांच्या प्रशांची काही पडलेली नाही बस चमकोगिरी करायची पडलेली आहे असा सूर सामान्य माणसाचा आहे…

आता राजकीय खेळी खेळून उद्या पासून अमळनेर शहरातील सर्व दुकाने आणि व्यवहार सुरू केले जात आहेत. आता ही राजकीय खेळी आणि राजकारण सामान्य माणसाला त्रास दायक ठरू नये. एव्हढीच अपेक्षा…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button