Maharashtra

लॉक डाऊन च्या काळामध्ये बेघर, वृध्द, भिकारी आणि गोरगरीब यांच्या उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून यासाठी प्रशासनाकडून जेवणाची सोय

लॉक डाऊन च्या काळामध्ये बेघर, वृध्द, भिकारी आणि गोरगरीब यांच्या उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून यासाठी प्रशासनाकडून जेवणाची सोय

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे शहरातील बेघर, वृध्द, भिकारी, मजुर यांची उपासमार होवू नये म्हणून प्रशासनाकडून प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार रॉबिनहुड आर्मीच्या मदतीने 7 दिवस अन्नदान करण्यात येणार आहे.
सध्या पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना या साथीच्या रोगाने थैयमान घातले आहे. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत चालेली आहे. यामुळे प्रशासनाकडून दि. 06 रोजीच्या मध्यरात्रीपासून पंढरपूर शहरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे पंढरपूर शहरात पुर्णपणे शुकशुकाट आहे. शहरात सुमारे 400 ते 500 हून अधिक बेघर, मजूर, भिकारी तसेच परराज्यातील मजुर आहेत. लॉक डाऊनमुळे त्यांची उपासमारी होवू नये यासाठी प्रशासनाने रॉबीन हुड आर्मीच्या मदतीने त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज लॉक डाऊनच्या पहिल्या दिवशी पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या हस्ते अन्‍नदानास सुरूवात करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button