Chandwad

चेंबर फुटल्याने रस्त्यावर पाणी,नगरपरिषदेने लक्ष घालण्याची मागणी…

चेंबर फुटल्याने रस्त्यावर पाणी,नगरपरिषदेने लक्ष घालण्याची मागणी…

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड नगरपरिषद हद्दीतील फुलेनगर तळवाडे रोड भागातील रहिवासी यांनी चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अभिजित कदम यांना आज एक निवेदन दिले आहे.त्यात म्हटले आहे की फुलेनगर तळवाडे रोड भागात काँक्रीटकरणाचे काम सुरू असताना सामूहिक चेंबर फुटलेले आहे.या चेंबरमधील पाणी तळवाडे रस्त्यावर येत असून यामुळे जनता त्रस्त झालेली आहे.रस्त्यात खड्डे पडलेले असल्याने अपघात होतात.तसेच घाण पाण्या रस्त्यावर आल्याने डेंगू आजार पसरू शकतो.चांदवड नगरपरिषदने दोन दिवसात यातून मार्ग काढावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.यावेळी प्रसाद प्रजापत,मनोज जाधव,गुड्डू खैरनार यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button