Nashik

खरीप हंगाम पूर्व मशागती साठी दिंडोरी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

खरीप हंगाम पूर्व मशागती साठी दिंडोरी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : दिंडोरी कृषी विभागाच्या वतीने या वर्षी सोयाबीन बियाणांची कमतरता असल्याने बीज प्रक्रिया कशी करावी व घरचे घरी आपल्या बियाणाची उगवण क्षमता कशी तपासावी याविषयीचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक तालूक्यातील जा नोरी
आंबे दिंडोरी ज ऊळ के दिंडोरी शिव न ई व
वरवंनडी
गावांमध्ये कृषी सहाय्यक श्रीमती मनिषा पाटील यांनी कोविंड-19 संसर्ग टाळण्या विषयीचे सर्व नियम पाळून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करून सोयाबीन या पिकाची पेरणी करावी. तसेच बियाणास जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया, डाळवर्गीय पिकासाठी व एकदल वर्गीय पिकासाठी बीज प्रक्रियाबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. रासायनिक खतांचा वापर काही प टीत कमी करून खर्चात बचत करावी. शेतकऱ्यांना आपले बांधावर खते कोणत्या प्रकारे उपलब्ध करून घेता येईल. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधावर व सलग फळबाग लागवड तसेच याच योजनेअंतर्गत शेततळे खोदकाम व प्लास्टिक अस्तरीकरण या ब्बतीत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये कशा प्रकारचे
.. फॉर्म भरून..भाग घेता येईल याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी माहिती प्रोत्साहन, प्रेरणा व मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी कळवण कैलास खैरनार , तालुका कृषी अधिकारी, दिंडोरी अभिजीत जमधडे,उमराळे मंडळ कृषी अधिकारी विजय पवार,कृषी पर्यवेक्षक एम. जी. जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली ठिक- ठिकाणी प्रात्यक्षिक करण्यात येत आहे.
फोटो-दिंङोरी तालूका कृषी विभागाच्या वतीने शेतक-यांना कृषी विषय मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक मनिषा पाटील

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button