Amalner

? Big Breaking.. अमळनेर तहसील आवारातून 3 टेंपो चोरीस…अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

? Big Breaking.. अमळनेर तहसील आवारातून 3 टेंपो चोरीस…अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

अमळनेर तहसिल कार्यालयाच्या आवारात तलाठी लोंढवे यांनी दि.21/11/2020
रोजी पंचनामा करून तसेच दहिवद तलाठी यांनी दि.21/11/2020 रोजी पंचनामा करून अवैध वाळू वाहतुक करणारे टैम्पो जप्त करून तहसिल
कार्यालय अमळनेर च्या आवारात जमा केलेले होते. 1) सदर टेंपो विना क्रमांकाचा पिवळ्या रंगाचा श्री अफजल इब्राहीम रा अमळनेर याचा
मालकीचा होता 2)विना क्रमांकाचा पिवळ्या रंगाचा टेम्पो श्री भय्या पाटील रा पैलाड अमळनेर यांच्या मालकीचा 3) बिना क्रमांकाचा निळ्या रंगाचा
टैम्पो श्री सौरभ पाटील रा कॉटन मार्केट जवळ अमळनेर यांच्या मालकीचा होता.हे तिन्ही या तहसिल कार्यालय आवारात जमा करण्यात आलेले होते.

काल दि 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 9..30 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.प्रत्येक टेंपो अंदाजे 25 हजार किंमतीचा असे साधारणपणे 75 हजार रु ची मालमत्ता असलेला मुद्देमाल चोरून नेण्यात आले आहेत.

याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात संदीप पाटील यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.भारतीय दंड संहिता कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास बापू साळुंके हे करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button