चांदवडला खासदार व आमदारांनी घेतली कोरोना संदर्भात बैठक
उदय वायकोळे चांदवड
चांदवड : आज खासदार डॉ.भारतीताई पवार व आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी तहसील कार्यालय, चांदवड येथे भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात व नियोजनावद्दल प्रांताधिकारी चंद्रशेखर देखमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, डी. वाय.एस.पी. समीर साळवे साहेब, गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज ठाकरे, उपजिल्हा वैद्यकीय निरीक्षक डॉ.सुशीलकुमार शिंदे, फिजिशियन डॉ.दळवी, पोलिस निरीक्षक समीर बारावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर, मा.नगराध्यक्ष भूषण कासलिवाल, कु.उ.बा.स.सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे,मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, भाजप जेष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, बालविकास प्रकल्प अधिकारी चौधरी साहेब, नगरपरिषद अभियंता चौधरी, मिलिंद खरे, मुकेश आहेर आदींच्या उपस्थित बैठक झाली.
बैठकीत चांदवड तसेच संपूर्ण तालुक्यात होणाऱ्या कोविड सेंटर व सेंटर मधील कामसंदर्भात चर्चा झाली यावेळी डॉ.आहेर यांनी सांगितले की, मार्केट कमिटी तसेच कांदा मार्केट लवकरच सुरू होणार आहे परंतु बाजार समिती मधील सर्व कर्मचारी, व्यापारी व मापारी यांचीही तात्काळ लसीकरण करावे. त्याचबरोबर तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरील येणारे शेतकरी यांचीही तपासणी करावी.
तालुक्यातही सर्व कोविड सेंटर मधील ऑक्सीजन संदर्भात माहिती घेतली.
फिजिशियन डॉ.दळवी यांच्या कडून ही सध्या उपचार घेत असलेले व उपजिल्हा रुग्णालयातुन नाशिक येथे पाठवलेल्या रुग्णांची ही माहिती घेतली.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार
म्युकरमायकोसेस संदर्भात जास्त काळजी घ्यावी कारण तालुक्यात रुग्ण वाढत असल्यामुळे जास्त काळजी घेण्याची गरज आहे व कोविड सेन्टर तसेंच तालुक्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळल्यास तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालय किंवा मेडिकल कॉलेज आडगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवणे असे डॉ.दळवी यांना सांगितले व तालुक्यात जास्तीत जास्त जनजागृती करावी असेही आमदार डॉ.आहेर यांनी तहसीलदार प्रदीप पाटील व महेश पाटील यांना सांगितले.
आज आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी आमदार निधी अंतर्गत २८ ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर्स उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या कडे सुपूर्द केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आपणा सर्वांना समोरे जायचे आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व अधिकारी, डॉक्टर, नर्स व तालुक्यातील सर्व सेवाभावी संस्था यांनी सर्वांनी एकजुटीने लढायचे आहे म्हणून सर्वांनी आपापली जबाबदारी पार पडावी असे आमदार डॉ.आहेर यांनी सांगितले.






