फैजपुरात स्वच्छ सर्व्हेक्षण दोन हजार एकवीस माझी वसुंधरा अभियान सुरू
सलीम पिंजारी फैजपूर यावल
फैजपूर : येथील स्वच्छ सर्वेक्षण 2021 व “माझी वसुंधरा अभियान सुरु झाले असून शासनाच्या निसर्ग बचाव कार्यक्रम अंतर्गत फैजपूर नगरपरिषद “स्वच्छ सर्वेक्षण 2021” व “माझी वसुंधरा अभियान”सहभागी असून पालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी नागरिकांच्या सहभागामुळे स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये फैजपूर शहराने वेस्ट झोन मध्ये रँकिंग 82 मिळवली होती. यावर्षी देखील आपल्या सहभागामुळे स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान मध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन आपली रँकिंग उंचावणे हे उद्दीष्ट आहे. त्याअनुषंगाने दिनांक 03/02/2021, बुधवार रोजी दुपारी 03 वाजेला बौद्ध स्मशानभूमी येथे नगरपालिका कर्मचा-यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. किशोर अशोकराव चव्हाण यांनी वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी फैजपूर नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.






