Ratnagiri

?️ Big Breaking..सावकाराच्या घरावर छापा

?️ Big Breaking..सावकाराच्या घरावर छापा

रत्नागिरी : जादा व्याज आकारून वसुलीसाठी कर्जदाराला मारण्याची धमकी देणार्‍या मान्यताप्राप्त सावकाराच्या घरावर छापा टाकून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने कागदपत्रे जप्त केली आहेत. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयात एका तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार रत्नागिरी येथील एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्ज घेतानाच त्यांनी व्याजाचे पैसे वजावट करून कर्ज दिले होते. असे असतानाही सावकाराचा मुलगा वारंवार व्याजाचे पैसे मागत होता.
दि. 5 नोव्हेबरला घरी एकटाच असताना रात्री 11.45ला गुंडांना घेऊन या मुलाने घराचा दरवाजा वाजवला व त्यानंतर व्याजी पैशाची मागणी करीत मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सावकारी परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदाराने केली होती.
जिल्हा उपनिबंधक अशोक गार्डी यांनी रत्नागिरी तालुक्याचे सहाय्यक निबंधक शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली 15 अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक नियुक्त करीत 30 डिसेंबर रोजी सावकाराच्या निवासस्थानाची झडती घेतली. यावेळी आक्षेपार्ह कागदपत्रे प्राप्त झालेली असून त्यांची छाननी करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्हयामध्ये एकूण 72 परवानाधारक सावकार असून त्यातील रत्नागिरी तालुक्यामध्ये 52 परवानाधारक सावकार आहेत. सावकारीबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री अशोक गार्डी यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button