Amalner

? Big Breaking.. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अमळनेरात खून…गुन्हा दाखल.. आरोपी अटकेत..

? Big Breaking.. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अमळनेरात खून…गुन्हा दाखल.. आरोपी अटकेत..

अमळनेर शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीला च रात्री उशिरा खून झाला आहे.2021 ची सुरुवात तर धमाकेदार झाली आहे.धरणगाव रोड वरील म्हाडा वसाहतीत आज मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास खून झाल्याची घटना घडली आहे. 2021 च्या सुरुवातीलाच तालुका हादरला असून मयत व्यक्ती सराईत गुन्हेगार होता. या घटनेतील आरोपी 2 महिलांसह 1 पुरुष असून त्यांना पोलिसांनी रात्री तात्काळ अटक केली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव कमल फतरोड असून पुढील कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की आधी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी काठीने मारहाण केल्याने एक व्यक्ती चा मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनीत घडली.

३१ रोजी संध्याकाळी पाच वाजता शीतल मुकेश
सैंदाणे व कमल मुनिर फथरोड यांच्यात भांडण सुरू झाले. एकमेकांना शिवीगाळी वरून सुरू झालेले भांडणाचे रूपांतर मारामारीत झाले .सुरुवात किरकोळ भांडणावरून झाल्याने
अनेकांनी दुर्लक्ष केले.पण नंतर सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास शीतल मुकेश सैंदाणे, मुकेश गोकुळ सैंदाणेव भाग्यश्री उर्फ भुरी राजेंद्र पाटील या तिघांनी कमल फथरोड याला बोलावले लाठ्याकाठ्यानी कमलच्या छातीवर, डोक्यावर, कपाळावर व हातावर मारहाण केली. त्यात रक्त सांडून कमल रस्त्यावर पडलेला होता. कमलचा मृत्यू झाला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
म्हाडा कॉलनी टाकरखेडा रस्त्यावर शहराबाहेरअसून रात्री 11 वाजेच्या
सुमारास पोलिसांना माहिती मिळाल्यावर
डीवाय.एस.पी. राकेश जाधव, पोलीस निरीक्षक
अंबादास मोरे पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी शीतल, मुकेश व भाग्यश्री उर्फ भुरी यांचा शोध घेतला असता ते तिघे फरार झाल्याचे समजले. तिघांनी पातोंडा येथे असल्याचे समजल्यावर पोलिसांनी
त्यांना अटक केली.
कमल पथरोड हा गुन्हेगार होता एका खुनाच्या गुन्ह्यात १४ वर्षे शिक्षा झाली होती.

याबाबतीत 302 अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार कलम लावण्यात आले असून तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button