Amalner

?महत्वाचे…..मासिक पाळीत लस घ्यावी की नाही..!किती सुरक्षित….!जाणून घ्या..!व्हायरल

?महत्वाचे…..मासिक पाळीत लस घ्यावी की नाही..!किती सुरक्षित….!जाणून घ्या..!

कोरोना विषाणूची दुसरी लाटेने देशभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी भारत सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग अधिक वाढविला आहे. त्यानुसार 1 मे 2021 पासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्व नागरिक हे लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल (Viral message) होत आहे की, मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये. व्हायरल होणाऱ्या या मेसेजवर सरकारकडून स्पष्टीकरण आलं आहे.सध्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मासिक पाळी त महिलांनी लस घेऊ नये.

  • मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस घेतल्यास (covid vaccine during menstruation) त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे पाळीच्या ५ दिवस आधी किंवा ५ दिवस नंतरच्या कालखंडात लस घेऊ नये,असे सल्ले देणारे मेसेज आणि ग्राफिक्स सोशल मीडियातून व्हायरल होताहेत.ह्यात किती तथ्य आणि सत्यता आहे ते ही पाहणे आवश्यक आहे.
  • काय आहे मेसेज..!
  • सर्व महिलांसाठी सूचना
“१ मे पासून वयाच्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना लसीकरण सुरु होत आहे. मुलींनी त्यांच्या मासिक पाळीचे दिवस लक्षात घेऊनच लसीकरण करून घ्यावे.
मासिक पाळीच्या ५ दिवस आधी आणि ५ दिवस नंतर लस घेऊ नये कारण त्या काळात शरीरातील प्रतिकारशक्ती फारच कमी असते.
लस पहिल्यांदा प्रतिकारशक्ती कमी करते आणि मग नंतर वाढते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात लस घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
तुमच्या बहीण, मैत्रीण, गर्लफ्रेंड आणि कुटुंबियांसोबत ही माहिती शेअर करा.अश्या पध्दतीचा msg व्हायरल झाला आहे.

मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस घेणं नुकसानकारक ठरू शकतं का?

ह्या संदेशाची पडताळणी करण्यासाठी ठोस प्रहारने विविध रिसर्च आर्टिकल्स, लस बनवणाऱ्या कंपनीजचे फॅक्ट शिट्स आणि तज्ज्ञ डॉक्टर्सची मते जाणून घेतल्या नंतर अनेक महत्वपूर्ण माहिती मिळाली.

भारतात प्रामुख्याने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लस दिल्या जात आहेत. यात त्यांनी लस कोणी घ्यावी आणि कोणी घेऊ नये याची पूर्ण माहिती दिली आहे.एक आहे भारत बायोटेक आणि दुसरे आहे सिरम इन्स्टिट्यूट..या दोन्ही कंपन्यांनी लस कोणी आणि केंव्हा घ्यावी याची माहिती दिली आहे.

1)भारत बायोटेक – कोव्हॅक्सिन

ज्या लोकांना कुठल्या प्रकारच्या ऍलर्जी आहेत, अंगात ताप आहे, रक्तस्राव होणारा किंवा रक्त पातळ होण्यासाठी गोळ्या चालू असणारा काही आजार आहे अशांनी ही लस घेऊ नये किंवा तज्ज्ञ डॉक्टरच्या मार्गदर्शनाखालीच निर्णय घ्यावा.
ज्यांनी दुसऱ्या कंपनीची लस घेतली आहे अशांनी ही लस घेऊ नये. तसेच ज्यांना एड्स सारखे प्रतिकारशक्ती कमी असणारे आजार आहेत किंवा प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे काही औषधे चालू आहेत अशांनी ही लस घेऊ नये.स्तनदा मातांनी किंवा गरोदर मातांनी सुद्धा ही लस घेऊ नये.

2)सिरम इन्स्टिट्यूट – कोव्हिशिल्ड

जर पहिल्या डोसमुळे काही ऍलर्जीक रिऍक्शन आली असेल किंवा लशीत वापरलेल्या एखाद्या रसायनामुळे पूर्वी कधी ऍलर्जीक रिऍक्शनचा अनुभव असेल तर ही लस घेऊ नये असे सांगण्यात आले आहे. तसेच स्तनदा मातांनी किंवा गरोदर मातांनी ही लस घेण्यासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

मासिक पाळीच्या आणि रोग प्रतिकारशक्ती

महिलांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान अशक्त पणा तसेच प्रतिकारशक्ती कमी होत असते. साधारण २८ दिवसांचे हे मासिक पाळीचे चक्र विविध दिवसांत विविध पद्धतीने प्रतिकारशक्तीवर निश्चितच परिणाम करते.
मासिक पाळीत रक्तस्त्राव चालू होण्याच्या दिवसापासून म्हणजे चक्राच्या पहिल्या दिवसापासून ४ दिवसांपर्यंत प्रतिकारशक्ती काहीशी कमीच असते. या नंतर १४ व्या दिवसाच्या आसपास म्हणजे गर्भधारणेसाठी योग्य असण्याच्या काळात पुरुषाच्या शुक्राणूना स्वतःच्या शरीरात स्थान देण्यासाठी शरीर प्रतिकारशक्ती कमी करून ठेवतं. याच काळात बाह्य विषाणूंना हल्ला करण्याची नामी संधी असते.मासिक पाळीच्या काळात लस घ्यावी का?‘हेल्थ’ नावाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं पोर्टल आहे, जे सातत्याने आरोग्यविषयक नव्या घडामोडी, रीसर्चेस यांवर रिपोर्ट्स पब्लिश करत असतं. त्यावरीलच एका आर्टिकल मध्ये त्यांनी खालील वाक्य वापरलं आहे. यात ते म्हणतात.

सर्वप्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की, तुमची मासिक पाळी चालू आहे म्हणून तुम्ही कोरोना लसीकरणापासून वंचित रहावं (covid vaccine during menstruation) यास कुठलेच शास्त्रीय कारण नाही. सीडीसी (Centers for Disease Control and Prevention) आणि ACOG (American College of Obstetricians and Gynecologists) या दोन्हींच्या लस कुणी घेऊ नये या यादीमध्ये मासिक पाळी चालू असणाऱ्या स्त्रियांचा उल्लेख नाही.हा प्रश्न आज का उद्दभवला..?आतापर्यंत ४५ वर्षे वयोगटाच्या वरील स्त्रियांचे लसीकरण झाले. या वयोगटातील बऱ्याच स्त्रियांची साधारणपणे रजोनिवृत्ती झालेली असते. त्यामुळे आता पर्यंत हा विषय चर्चेत आला नाही. पण आता 18 वर्षांपासून लसीकरणास सुरुवात केली जात आहे. परिणामी 18 वर्षांवरील मुलींना महिलांनी आता मासिक पाळीत लस घ्यावी की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आम्ही अत्यावश्यक सेवा क्षेत्रात ज्या महिला कार्यरत आहेत म्हणून त्यांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या अनुभवानुसार मासिक पाळीच्या काळाचा लसीकरणाशी काहीएक संबंध नाही. त्या काळातही त्रास झाला नाही किंवा त्या नंतर सुद्धा पाळीमध्ये लसीकरणामुळे विशेष काही फरक पडल्याचे जाणवले नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

लस घेतल्यानंतर काय होते…

लसीकरण झाल्यानंतर येणारा हलकासा ताप, डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणे प्रतिकारशक्ती कमी झाल्याची नव्हे तर प्रतिकारशक्तीचा लसीला मिळत असलेला प्रतिसाद असण्याची लक्षणे आहेत.

मासिक पाळीच्या काळात प्रतिकारशक्तीवर काहीसा परिणाम होतो हे जरी खरे असले तरीही ती एवढीही खालावत नाही की ज्याची तुलना एड्सग्रस्त व्यक्तीच्या पातळीएवढी होईल. कोरोना प्रतिबंधात्मक लशीकरणासाठी दिलेल्या नियमावलीतही असा विशिष्ठ उल्लेख आढळून येत नाही.

त्यामुळे व्हायरल दाव्यांना खरे मानून मासिक पाळी आली म्हणून कोरोना लसीकरण टाळू नये. लसीकरण, मास्क-सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हेच कोव्हीड पासून वाचण्याचे प्रभावी उपाय आहेत.

डॉ. मुठ्ठे म्हणाल्या की “मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणताही अडथळा असू नये. तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळाली असेल तेव्हा जरूर लस घ्या. तरुण मुली कामानिमित्ताने घराबाहेर पडत असतील कारण सगळ्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नसतं. अत्यावश्यक सेवेत अनेक महिला काम करतात. त्यांची मासिक पाळी केव्हाही सुरू असू शकते किंवा नसू शकते. त्यांची नोंदणी झाली असेल आणि लस मिळत असेल तर त्यांनी जरूर लस घ्यावी.

कोव्हिडमुळे बदलू शकतं मासिक पाळीचं चक्र?

महाराष्ट्रात कोरोनारुग्णांच्या एकूण संख्येपैकी जवळपास 40 टक्के महिला आहेत. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांकडून आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, कोव्हिडमुळे महिलांच मासिक पाळीचं चक्र बदलतं का?कोरोनामुक्त झालेल्या महिलांमध्ये पाळी अनियमित येणं, पाळी येण्यास उशिरा होणं, रक्तस्राव होण्याचा पॅटर्न बदलणं, खूप जास्त रक्तस्राव होणं अशा तक्रारी आढळून आल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मते, कोरोनासंसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये इतर वैद्यकीय समस्या दिसून येतात. त्यामुळे पाळीत बदल कोव्हिडमुळे झाला का? याबाबत ठोस सांगता येणार नाही.कोव्हिडनंतर महिलांच्या अंडाशयाला सूज येण्याच्या माहितीची कागदोपत्री नोंद आहे. या केसेस नोंदवण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्गानंतर अंडाशयाला सूज असेल तर, मासिक पाळी दरम्यान त्रास किंवा बदल होण्याची शक्यता असते.

कोव्हिडनंतर महिलांच्या प्रजनन प्रणालीत बदल होतात?

कोरोना संसर्गात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. काहींना फुफ्फुसाचा त्रास होतो. तर, काहींमध्ये इतर वैद्यकीय समस्या निर्माण होतात.

“कोव्हिडनंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने प्रजनन प्रणाली कमकुवत होण्याची शक्यता असते पण शक्यतो असे कमी प्रमाणात होते.कारण कोव्हीड चा संबंध हा फुप्फुसांशी निगडित असतो.” असं फोर्टिस रुग्णालयाच्या डॉ. मुठ्ठे यांनी सांगितले.

महिलांनी काय करावं?

स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, महिलांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी.

  • योग्य आहार, व्यायाम गरजेचा आहे
  • शरीराला योग्यवेळी रिलॅक्स केलं पाहिजे
  • झोप वेळेवर हवी
  • जास्त वेळ बसून काम करू नये. कामातून मध्येच थोडा ब्रेक घ्यावा.
कोव्हिड-19 संसर्गानंतर शरीराची झालेली झीज हळूहळू भरून येत असते.त्यामुळे मासिक पाळीचं चक्र जर विस्कळीत झालं असेल तर हळूहळू पूर्वपदावर येईल.तसेच पाळीचे 3 दिवस शक्यतो लस घेणे टाळावे कारण ह्या 3 दिवसांत गर्भपिशवीला थोडी सूज असते,पाणी तयार झालेलं असत,थोडा थकवा स्त्रियांना असतो बाकी पाळीच्या आधी 4 दिवस आणि नंतर 4 दिवस वै न पाळता लस घेता येऊ शकते.मासिक पाळी ही नैसर्गिक असून ज्या महिलांना जास्त रक्तस्त्राव होत असेल त्यांनीच फक्त लस घेताना थोडं थांबावे अन्यथा नॉर्मल महिलांनी पाळीचे 3 दिवस सोडून लस घेण्यास हरकत नाही असे डॉ अपर्णा मुठ्ठे स्त्री रोग तज्ञ यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button