Amalner: यशपंढरी इंग्लिश क्लासेसचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न… जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हमकास यश मिळते… डॉ एस आर चौधरी
अमळनेर येथे यशपंढरी क्लासेस चा विद्यार्थी गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.अमळनेर येथील नांदेडकर हॉल येथे हा सोहळा सकाळी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमात इ.१२वी वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थीनी सन २०२३ व सन २०२४ या दोन वर्षांतील गुणवंतांचा रोख रक्कम, ट्राॅफी, प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. दर वर्षी “यशपंढरी इंग्लिश क्लास” ५ वी ते १२ वी (प्रत्येक वर्गात) प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना- विद्यार्थींनीना सायकल+रोख+ट्राॅफी+प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येते. यावर्षी कुमारी दिपाली पाटील, पिंपळीकर
१२वी सायन्स या विद्यार्थीनीने मानाचे बक्षीस सायकल पटकावले. तसेच श्री संजय गोविंदा बागले, ग्रामविकास आधिकारी (पालक) यांच्याकडून दरवर्षी त्यांच्या आई, वडील व सासरे यांच्या स्मरणार्थ प्रथम, द्वितीय, तृतीय व होतकरु गरीब विद्यार्थी – विद्यार्थीनी यांना रोख बक्षीसे दिली जातात. ती बक्षिसे सन २०२३ व २०२४ या दोन वर्षे चे विजेते खालील प्रमाणे-
इंग्लीश विषयात सर्वोच्च गुण: कुमारी नंदिनी मच्छींद्र पाटील, कै. उत्तम ताराचंद सैंदाणे ५००० बक्षीस , मंगरूळकर ८१ गुण
इंग्रजी विषयात द्वित्तीय:- नम्रता सोनवणे, अमळनेरकर कै. गोविंदा शंकर बागले बक्षीस ३२००रु ७५ गुण
इंग्रजी विषयात तृत्तीय:- मयुरी राजपूत, जैतपिरकर कै. सौ. राणुबाई गोविंदा बक्षीस २००० रू ७४ गुण
गरीब होतकरू विद्यार्थी बक्षीस ..
कै. गोविंदा शंकर वागले बक्षीस = १५०० विभागून
१)आदित्य चौधरी ७५०रु ट्रॉफी, प्रमाणपत्र
२)भूषण बोरसे ७५०रू ट्रॉफी, प्रमाणपत्र
गरीब होतकरू विद्यार्थीनी बक्षीस कै.सौ राणूबाई, गोविंदा बागले बक्षीस विभागुन
१) लांबोळे किरण ७५०रु ट्रॉफी, प्रमाणपत्र
२) कोमल भोई ७५०रु ट्रॉफी, प्रमाणपत्र सन २०२४ यावर्षीचे बक्षीस विजेते प्रथमः- दिपाली पाटील.
पिंपळेकर कै. उत्तम ताराचंद सैंदाणे बक्षीस ५००० ट्राॅफी+प्रमाणपत्र
द्वित्तीय :- पूजा पाटील ३०००+ ट्रॉफी + प्रमाणपत्र
तृत्तीय हेमांगी पाटील २०००+ट्राॅफी + प्रमाणपत्र
गरीब होतकरू विद्यार्थी बक्षीस कै. गोविंदा शंकर बागले बक्षीस , रिया संदेश गुजराथी १५००रू ट्राॅफी + प्रमाणपत्र,
दर्शना अशोक बोरसे १५००रू ट्राॅफी + प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. वसंत जाधव, शिक्षणविस्तार अधिकारी व अपंग संघटना सचिव तळोदा यांनी बक्षीस वितरण प्रसंगी मार्गदर्शन केले.मनात जिद्द, परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वासाची जोड हवी असे प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा.डॉ एस.आर.चौधरी यांनी बक्षीसवितरण प्रसंगी अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.प्रकाश पाटील यांनी केले.
यावेळी संजय गोविंदा बागले,आय.के.डी. संचालक किरण माळी , पवन पाटील, प्रफुल्ल अकॅडमी कॉमर्स संचालक सुवर्णदीप राजपुत , ईश्वर महाजन पत्रकार विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यश पंढरी क्लासेसचे संचालक प्रकाश पाटील यांनी सत्कार व बक्षिसे दिल्याबद्दल त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांनी सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.






