Amalner

?️अमळनेर कट्टा..देशाच्या माजी सैनिकाला पाकिस्तानी संबोधणाऱ्याचा जाहीर निषेध करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा……

?️अमळनेर कट्टा..देशाच्या माजी सैनिकाला पाकिस्तानी संबोधणाऱ्याचा जाहीर निषेध करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…….

जळगांव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड हे एक माजी सैनिक ही आहेत. त्यांनी शहरातील अनाधिकृत बॅनर काढताना जैन सामाजाचे दीक्षार्थी बॅनरही सन्मापूर्वकच काढले. त्यांची ही कारवाई प्रतिष्ठांना हादरवणारी असल्याने याला जातीय चे रंग देऊन त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांनी सैन्यात असताना दिवसरात्र पाकिस्तानी सैन्याचा, घुसखोरांचा, आतंकवाद्यांच्या नरड्याचा घोट घेण्यासाठी नेहमी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. दिवस रात्र, उन्हा-तान्हात, पावसात, थंडीत सिमेवर खडा पहारा दिला आहे. तरीही त्यांची देशसेवा विसरून शासकीय काम करीत असतानाच एका बॅनरवरून त्यांना टारगेट करीत काही समाजकंटकांनी त्याला जातीयतेचा रंग देऊन हे प्रकरण चिघळले आहे. तर पुणे येथील वाघोलीचा अतुल चोरडिया नामक समाजकंटकाने अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून संदीप गायकवाड यांचा एकेरी उल्लेख करून ते पाकिस्तानचे हस्त, एजंट असल्याचा उल्लेख केला आहे. ऐवढेच नव्हे तर गायकवाड यांनी ‘गु’ खाल्ला आहे, अशा खालच्या स्तराची भाषा वारून जीभही घसरली आहे. हा केवळ माजी सैनिक संदीप गायकवाड यांचा अपमान नसून संपूर्ण भारतातील आजी माजी सैनिकांचा घोर अपमान करून देशद्रोहाचाच गुन्हा केला आहे. जो समाज शांती आणि संयमाची शिकवण देतो, त्याच समाजातील या चोरडिया नामक व्यक्ती आपल्या समाजाची आणि धर्माचीच शिकवण विसरला आहे. त्यामुळे अशा देशद्रोहिंचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरवण्यात यावा, अशी मागणी देशातील आजी माजी सैनकांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button