कवपिंप्री येथे निर्जंतुक फवारणी
तरुणांनी घेतला पुढाकार
रजनीकांत पाटील
अमळनेर : सध्या जगभरात कोरोना या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांन म्हदे वाढच होत आहे सध्याची परिस्थिती पाहता कोरोना हा आपल्या तालुक्याजवळ येऊन पोहचला आहे या बाबत काही ग्रामीण भागात नागरिक आता स्वतःची चांगलीच काळजी घेतांना दिसत आहे.
तालुक्यातील कवपिंप्री येथे कोरोना विषाणूचा मोठया प्रमाणात जीवत हानी ची भीती व साथीच्या रोगांवर उपाययोजना म्हणून तरुणांनी स्वतः पुढाकार घेत निर्जंतुक फवारणी करण्यात आली या वेळी संपूर्ण गावातील घरांच्या आजूबाजूला परिसर स्वच्छतागृह, गटारी,उकिरडा, प्राण्याचें गोठे,मंदिरे तसेच सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्यात आली या बाबत गावातील लहरी बाबा मित्र परिवार कवपिंप्री गावातील तरुण कार्यकर्ते सागर पाटील, प्रताप महाजन,संभाजी पाटील,अभिषेक पाटील वाल्मिक पाटील,धनंजय पाटील,शिवाजी पाटील, रुपेश, रविंद, सुधाम आदी ची सहकार्य केली
या प्रसंगी उपस्थित राहून नागरिकांना स्वच्छता जनजागृती संदेश देत संवाद साधला






