राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे अमळनेर येथे पार पडली जनआक्रोश रोड रॅली…
अमळनेर : येथे राष्ट्रीय किसान मोर्चाची जन आक्रोश रोड रॅली काल दि. १६ रोजी पार पडली.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅली ची सुरुवात करण्यात आली. जमलेल्या मंडळीने शेतकरीविरोधी पास झालेल्या तीन काळ्या कायद्या विरोधात घोषणा दिल्या. व तेथून दुचाकीने रॅली अमळनेर तहसील कार्यालयाच्या दरवाज्याजवळ थांबली. तेथेही घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील व शिवाजी नाना पाटील यांची भाजप सरकारने पास केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यासंदर्भात माहिती दिली. भाजप सरकारच्या अर्थव्यवस्थेचे अपयश, शासकीय संस्था, संघटन विक्री संदर्भात स्पष्टीकरण केले. निवेदनात, शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, कॉरोना काळात, मजुरांच्या संदर्भात पास केलेले कायदे मागे घ्या. विद्यार्थ्यांसंबंधी पास केलेले कायदे रद्द करून गरीब व श्रीमंत यांच्या (राजा और रंक) मुलांना समान शिक्षण मिळाले पाहिजे, असे कायदे करा. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी वीज बिल भरणार नाहीत. व कोणतेही कोणतेच कर्जही भरणार नाहीत. तसेच संपूर्ण देशातील पुढील निवडणुकातुन ई व्हीं एम हद्दपार करा, व बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. अशाप्रकारे निवेदन तहसिलदार यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना पाठवण्यात आले. जन आक्रोश रॅलीत विश्वासराव पाटील, रमेश बोधरे, शामकांत पाटील, सुरेश पीरण पाटील, बी.के. सूर्यवंशी, कुद्रत अली मोहम्मद अली, शालिग्राम पाटील, शांताराम पाटील, जितेश संदांशिव, प्रा.सुभाष पाटील, शिवाजी नाना पाटील, सुनील पाटील इत्यादींचा सहभाग होता.






