Amalner

शिरूड ग्रामस्थांनी मानले शासन प्रशासनाचे आभार दत्त सार्वजनिक वाचनालया तर्फे सत्कार …

शिरूड ग्रामस्थांनी मानले शासन प्रशासनाचे आभार दत्त सार्वजनिक वाचनालया तर्फे सत्कार …

रजनीकांत पाटील अमळनेर

Amalner :- शिरूड गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित झाले. त्या आधारावरच शिरूड येथील सजग नागरिकांनी व श्री दत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील नूतन आरोग्य अधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती निमित्त सार्वजनिक अभिनंदन केले.
शासनाने ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना केली. परंतु अनेक उपकेंद्रांना अधिकारी नव्हते त्यामुळे ग्रामीण जनतेची हेळसांड होत होती. ती असुविधा थांबवण्यासाठी शिरूड येथील आरोग्य उपकेंद्राला डॉक्टर अतुल चौधरी यांच्या रूपाने पूर्णवेळ आरोग्य अधिकारी लाभले. त्याबद्दल त्यांचा धनराज पाटील व शशिकांत पाटील ह्रदय सत्कार करण्यात आला.त्यांनी कार्यभार स्वीकारताच ग्रामस्थ शिरुड व श्री दत्त सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर अतुल चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी गावकऱ्यांचे मनोभावे सेवा करेन तसेच आरोग्यविषयक काही समस्या असतील तर ग्रामस्थांनी मला निसंकोचपणे आरोग्य उपकेंद्र भेटावे. व आपल्या समस्येचे निराकरण करून घ्यावे असे सांगितले. यावेळी आरोग्य सेविका अनिता पाटील आरोग्य सेवक योगेश गावित आशा सेविका कल्पना पाटील,पूनम पाटील, अंगणवाडी सेविका सीमाताई कुलकर्णी,आशाताई माळी चिंधाताई पाटील व ग्रामसेवक सूर्यवंशी भाऊसाहेब कौतुक करत यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्या गावात यांनी करोना काळामध्ये शिरूडला मोठी मदत केली होती त्यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुडी संस्थेचे संचालक जयवंतराव पाटील, दत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, डी ए धनगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला नारायण पाटील रतन पाटील रजनीकांत पाटील पुंजू पाटील वसंतराव पाटील आनंदराव पाटील भालेराव पाटील विरभान पाटील पुंजू पाटील, नवल बैसाणे, योगेश पाटील,सतिश पाटील आदी नागरिकांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button