जिल्ह्याभरातुन ५८ जनावरांची सुटका एलसीबीची कारवाई; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
फहिम शेख नंदुरबार
नंदुरबार : नंदुरबारात शेडमध्ये बांधलेल्या १७ जनावरांची सुटका
नंदुरबार कत्तलीसाठी पत्र्याच्या शेडमध्ये जनावरे बांधुन ठेवण्यात आली होती. पोलीसांनी धाड टाकुन १७ जनावरांची सुटका केल्याची कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. याप्रकरणी दोघांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील रज्जाक पार्कमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरे बांधुन ठेवण्यात आली होती. ही जनावरे कत्तलीसाठी निदर्यपणे बांधलेल्या अवस्थेत मिळुन आली. यात १५ गोन्हे १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे व १५ हजार ५०० रुपये किंमतीची एक गाय व एक बैल अशी १७ जनावरे मिळुन आली. याबाबत पोशि. आनंदा मराठे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबु कुरेशी, कुक्तार कुरेशी (दोघे रा. कुरेशी मोहल्ला) यांच्याविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (बी) चे उल्लंघन कलम ९ (अ) सह प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करण्यास अधिनियम १९६० चे कलम ११ (च) सह महाराष्ट्र मुन्सिपल अॅक्ट १९६५ चे कलम २९१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पी.पी.सोनवणे करीत आहेत






