Pune

पोषण आहार अभियान प्रभावीपणे राबवा : अंकिता हर्षवर्धनजी पाटील

पोषण आहार अभियान प्रभावीपणे राबवा : अंकिता हर्षवर्धनजी पाटील

पुणे दत्ता पारेकर

पुणे -दि.1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. आपले पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची कुपोषणमुक्त भारत साठी “पोषण अभियान” महत्वकांक्षी योजना आहे.

बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये व साखर कारखाना परिसर मध्ये या मोहिमेचा भाग म्हणून सकस आणि पोषण आहाराचे महत्त्व सांगणारा माहिती फलकांच्या माध्यमातून व मा. मंत्री मा.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्या व यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात आले.

या जिल्हा परिषद गटातील बावडा, लाखेवाडी,बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, निर-निमगाव, कचरवाडी, सराटी, लुमेवाडी, गोंदि, ओझरे, गिरवी, पिंपरी बु,. नृसिंहपुर, भोडणी, वकिलवस्ती, सुरवड, शेटफळ-हवेली, भांडगाव व परिसरातील सर्व ग्रामपंचायतीच्या व आरोग्य सेविका, डाॅक्टर यांच्या माध्यमातून जनजागृती अभिमान राबविण्यात येत आहे.

कोरोना सारख्या गंभीर साथीच्या योगा प्रसंगी देखील पोषण अभियान याची जनजागृती ते गावोगावी करत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button