रावेर

रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी श्रीकांत महाजन यांचीच वर्णी तर उपसभापती पदी उस्मान तडवी

रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी श्रीकांत महाजन यांचीच वर्णी तर उपसभापती पदी उस्मान तडवी

विलास ताठे

रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डि.सी.पाटील यांनी रितसर आपला राजीनामा दिला असून ठरल्याप्रमाणे आता सभापती पदा ची संधी भाजप ला होती तर उपसभापती कांग्रेस कडे . याप्रमाणे सभापती पदा साठी श्रीकांत महाजन तर उपसभापती पदी उस्मान तडवी यांची नावे चर्चेत सुरू वाती पासून होती .पण रावेर विधानसभा निवडणुकीचा निकाल व मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील धक्कादायक निकाल पाहता भाजपचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला .तरी यांचा प्रभाव रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीवर होतो कि ठरल्याप्रमाणे जे नावे चर्चेत आहेत तीच वर्णी लागणार वा रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्णयात भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या शब्दांला किती महत्त्व मिळेल की अन्य दुसरा भाजपाकडून फर्मान बजाविण्यात येईल
ही एकच चर्चा यादरम्यान रावेर तालुक्यात जोरदार चर्चा रंगली जात होती. तसेच भाजपकडून गोपाळ नेमाडे हेही सभापती पदा साठी इच्छुक होते. कारणं मागच्या वेळी कांग्रेस कडून राजीव पाटील व डि.सी.पाटील यांनीही सहा सहा महिने पदभार स्वीकारला होता.यामुळे भाजप कडून काय निर्णय होतो हि उत्कंठा वाढली होती.
पण भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत श्रीकांत महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले .
आणि सर्व चर्चा बंद होऊन आज रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या मिटींग मध्ये सभापती पदी श्रीकांत महाजन यांचीच निवड झाली तर उपसभापती पदी उस्मान तडवी यांची निवड करण्यात आली.
या नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे निवडी बद्दल विद्यमान आमदार शिरीष चौधरी.लोकनियुकंत रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद मावळते सभापती डि.सी.पाटील.राजेंद़ पाटील.गोंडू महाजन निळकंठ चौधरी योगेश पाटील सह सुधीर पाटील प्रल्हाद पाटील जितु पाटील .सह
अनेक मान्यवर यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करून फुलगुचछ देवून सत्कार केला .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button