Maharashtra

नागपुर जिल्ह्यातील तीन शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

नागपुर जिल्ह्यातील तीन शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

नागपुर जिल्ह्यातील तीन शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

नागपुर जिल्ह्यातील तीन शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

नागपुर – प्रतिनिधी अनिल पवार
जिल्ह्यातील तीन शिक्षकांना ‘राज्य आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात प्राथमिक गटात राजुलवाडी (ता. उमरेड ) जि़प़ …
चांपा ता २९: – समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याचा व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने शिक्षक पुरस्कार दरवर्षी जाहिर करतात यात नागपुर  जिल्ह्यातील तीन शिक्षकांना ‘राज्य आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात  प्राथमिक गटात राजुलवाडी  (ता. उमरेड ) जि़प़ शाळेचे शिक्षक सहा.शिक्षक बळीराम दादाजी चापले  तर रामटेक तालुक्यातील प्राथमिक शाळा कांद्रि मनोहर येथील सहा .शिक्षक भास्कर जांभुळकर , माध्यमिक गटात श्री मोहनलाल रूधवानी सिंधी हिन्दी बॉईज हायस्कूल नागपुर येथील  सहा .शिक्षिका चित्रा मुजूमदार   यांचा समावेश आहे.
सन २०१८-१९च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर १०७शिक्षकांची निवड केलेली असून त्यामध्ये ३७प्राथमिक शिक्षक , ३९माध्यमिक शिक्षक , १८आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक , ८सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका , २विशेष शिक्षक (कला/ क्रीडा )व १अपंग शिक्षक / व १अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक 
शासनाने प्राथमिक , माध्यमिक आणि विशेष शिक्षक , आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१८-१९ पुरस्कारासाठी १०७ शिक्षकांची निवड केली आहेत .
या शिक्षकांना प्रत्येकी १लाख  रुपये पुरस्कारादाखल देण्यात येतील. पुरस्कार वितरण सोहळा ५ सप्टेंबर रोजी बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात होईल.
या पुरस्कारासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते़ अर्ज भरलेल्या शिक्षकांना नाशिक येथे बोलविण्यात आले व त्यातील काही शिक्षकांची निवड करून पुणे येथे मुलाखतीसाठी पाठविण्यात आले होते़ त्यातून ही निवड करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button