Amalner

श्री.एन.टी.मुदडा ग्लोबल व्ह्यू स्कुल, अमळनेर या शाळेचे प्राचार्य श्री.लक्ष्मण लजपथी नॅशनल अवॉर्ड ने सन्मानित

श्री.एन.टी.मुदडा ग्लोबल व्ह्यू स्कुल,
अमळनेर या शाळेचे प्राचार्य श्री.लक्ष्मण लजपथी नॅशनल अवॉर्ड ने सन्मानित

मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री.एन.टी.मुदडा ग्लोबल व्ह्यू स्कुल,
अमळनेर या शाळेचे प्राचार्य श्री.लक्ष्मण लजपथी यांचा दिनांक 01 डिसेंबर 2019
रोजी “हेरीटेज सिटी ऑफ इंडीया अहमदाबाद (गुजरात) येथे “Best National
Dynamic Principal of the Year Award” देवुन सन्मान करण्यात आला.त्या प्रसंगी वेगवेगळया क्षेत्राशी संबंधीत आवार्डचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेचे उत्कृष्ट व्यवस्थापन, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड कशा प्रकारे
निर्माण होईल यासाठी प्रयत्नशील असणे, विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात्मक परिक्षेत
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कशा पध्दतीने मजल मारता येईल याबद्दल योग्य
ते मार्गदर्शन करणे, अशा सर्व बाबींचा विचार करून सदर आवार्ड देण्यात आला.
हा आवार्ड प्रसिध्द सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे हस्ते प्रदान करण्यात
आला. या प्रसंगी पी.व्ही.एस.एम व ए.व्हि.एस.एम चे एक्स आर्मी चीफ श्री.प्रकाश
नेहरा हे उपस्थित होते. ओम एज्युकेशनचे चेअरमन श्री.राजेंद्र उपाध्याय व डायरेक्टर
श्री.उमेश गुज्जर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सदर आवार्ड मिळाल्याबद्दल प्राचार्य श्री. लक्ष्मण लजपथी सर यांचे, संस्थेचे
अध्यक्ष मा.श्री.प्रकाशभाऊ मुदडा, चेअरपर्सन सौ.छाया भाभी मुंदडा, सचिव श्री.अमेय
मुंदडा, सहसचिव श्री.योगेश मुंदडा, श्री.नरेंद्र मुंदडा, श्री.राकेश मुंदडा, श्री.पंकज
मुंदडा, सौ. दिपीका मुंदडा सर्व पदाधिकारी, प्रि-प्रायमरी प्राचार्या सौ. विद्या लक्ष्मण,
प्रि-प्रायमरी को-ऑडीनेटर सौ.योजना ठक्कर, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर
कर्मचारी, पालक व सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button