फैजपुर च्या तापी परिसर विद्या मंडळ येथे योगा विथ फॅमिली एनसीसी चा उपक्रम
सलीम पिंजारी
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात च्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या एककाकडून आयुष मंत्रालय, दिल्ली व डी जी, एन सी सी, दिल्ली यांच्या निर्देशानुसार व कर्नल सत्यशील बाबर, समादेशक अधिकारी, 18 महाराष्ट्र बटालियन एन सी सी, जळगाव आणि प्राचार्य डॉ पी आर चौधरी , यांच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस योगा ॲट होम विथ फॅमिली या संकल्पनेनुसार आपापल्या घरी विविध योगासने व प्राणायाम करून यशस्वीपणे साजरा केला.
सद्यस्थितीत कोरोना महामारी च्या संकट काळात विषाणू चा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी स्वतः समवेत 65 एनसीसी कडेट्स यांनी आपापल्या घरी परिवारासोबत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला. यासोबत माय गव्हर्मेंट ॲप वरील माय योगा माय लाईफ या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी व कर्नल सत्यशील बाबर यांनी कौतुक केले.






