नाफेडच्या माध्यमातून जास्तीत जास्त कांदा खरेदी करण्याची खा.डॉ.भारती पवार यांची केंद्राकडे मागणी
सुनील घुमरे
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदार संघ हा कृषीप्रधान मतदारसंघ असून येथील शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट दर्जाच्या कांद्याचे उत्पादन घेतो. तर उत्कृष्ट दर्जाचा कांदा हा परदेशामध्ये निर्यात केला जातो. तो उत्पादित कांदा विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणला जातो. सध्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे भारतातील सर्वच राज्यांत लॉकडाऊन केले आहे. मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन विक्रीसाठी तयार असताना कांद्याचे दर देखील घसरले आहेत. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाने देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता केंद्रीय कृषी मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाद्वारे (NAFED) जास्तीत जास्त कांदा योग्य किमतीत खरेदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याकरिता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर व चेअरमन, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED), नवी दिल्ली यांचेकडे खा.डॉ.भारती पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.






