Amalner

?️प्रेरणादायी..साने गुरुजी विद्या मंदीर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न…रक्तदान चळवळीचे प्रणेते मनोज शिंगाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण…

?️प्रेरणादायी..साने गुरुजी विद्या मंदीर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न…रक्तदान चळवळीचे प्रणेते मनोज शिंगाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण…

अमळनेर :- येथील साने गुरुजी विद्या मंदीर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण पार पडले.ह्या शाळेने आपला माजी विद्यार्थी मनोज शिंगाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक नवीनच आदर्श अमळनेरकरांसमोर ठेवला..अमळनेर नगरीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान चळवळ यशस्वीरीत्या राबविणारे,रक्तदानाचे महत्व तरुण पिढीला समजून सांगून त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रेरणा देणारे मनोज शिंगाणे हे साने गुरुजी शाळेचे माजी विद्यार्थी.. मनोज च्या कार्याचे कौतुक आणि सन्मान म्हणून या शाळेने 26 जाने 2021 रोजी 72 व्या प्रजासत्ताक दिनी आपल्या ह्या कर्तृत्ववान विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करून मनोजला सुखद धक्का आणि सर्व अमळनेर करांना नवी प्रेरणा दिली आहे.

याप्रसंगी “युवकांपुढील आव्हाने आणि उपाय” या विषयांवर खासदार उन्मेषदादा पाटील यांनी विचार मांडले. यावेळी रक्तदान चळवळीत मोलाचे योगदान देणारे मनोज शिंगाणे यांना ध्वजारोहणाचा मान देत सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार प्रसंगी रक्तदान चळवळीला सदैव साथ देणारे सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार प्रा. जयश्री साळुंके,गायिका अपेक्षा पवार ,पो नि अंबादास मोरे ,भरत पवार,युवा मित्र परिवाराचे राहुल पाटील, भूषण महाजन,दादा सोनार,पारस धाप, राहुल कंजर, विनोद पाटील, दीपक प्रजापती,परेश पाटील, राहुल आहिरे,यश वर्मा बापू चौधरी, प्रथमेश भोसले, भूषाण चौधरी इ. युवा वर्ग उपस्थित होते.

खासदार उन्मेष पाटील यांना युवा मित्र परिवाराने आश्वासन दिले की आपतकालीन संकटावेळी ५०० रक्त उपलब्ध होतील.या प्रसंगी सर्व रक्तदात्यांचे कौतुक करण्यात आल.राहुल बडगुजर ह्या युवा रक्तदात्याला खासदार उन्मेष पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप घोरपडे, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंत गुलाबराव पाटील, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल आप्पा पाटील,संचालक अशोक बाविस्कर, रमेश कदम, डॉ. अमृतराव देशमुख, सचिन शिंदे, विलास चौधरी, अमृत पाटील, भास्करराव बोरसे, डॉ. शेख शकील, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक सुनिल पाटील, कन्या हायस्कूल मुख्याध्यापिका अनीता बोरसे, विद्या मंदीर मुख्याध्यापिका मेधा देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button