Jalgaon

?जळगांव Live… कोरोना Update… फक्त चोपडा आणि चाळीसगाव राहील या दिवशी बंद…

?जळगांव Live… कोरोना Update… फक्त चोपडा आणि चाळीसगाव राहील बंद…

जळगाव-:- कोविड १९ आजाराचा वाढता संसर्गास रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राउत यांनी दोन दिवस चाळीसगांव व चोपडा शहरात कडक निर्बंध ठेवण्याचे आदेश आज दि ११ मार्च रोजी दिले आहे.
या घोषणेमुळे संतर्कता वाढली असून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कामाव्यतीरिक्त बाहेर पडू नये. कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे ही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

चाळीसगांव व चोपडा शहरावर विशेष निर्बंध घालतांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिनांक १३ मार्च रात्री १२ वाजून १ मिनिटांनी ते १४ मार्च रात्री १२{२४}वाजेपर्यंत कडक निर्बंध घातले आहे.

चाळीसगांव व चोपडा नगरपालिका क्षेत्रात सर्व बाजार पेठा त्यात प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये, सर्व शैक्षणिक संकुले,आठवडे बाजार, भाजीपाला दुकाने,किराणा व अन्य दुकाने, लोटगाडी, हातगाडी वरील व्यवसाय,चहा दुकान व हाॅटेल्स,खानावळ,उघड्यावरील व्यवसाय बंद ठेवण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. शाॅपीग माॅल्स,दारू दुकाने, बार्बर शाॅप,व्यायाम शाळा, जीम,गार्डन,पार्क,बाग-बगीचे,तसेच सर्व सामाजीक राजकिय व धार्मिक मेळावे यांच्यावर सुद्धा निर्बंध घातलेले आहे.

अत्यावश्यक सेवा जसे दूध विक्रेते, वैद्यकीय सेवा, मेडीकल सेवा, व अँब्यूलन्स सेवा,आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत सेवा कार्य वगळता इतर सर्व बाजार व्यवसाय म्हणजे या दोन्ही शहरातदोन दिवसाचे टाळेबंद(मिनी लाॅकडाउन)लावण्यात आले आहे. कोविड १९ च्या वाढता प्रसार रोखण्यासाठी व प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय यांनी जाहीर केलेला निर्णय अभिनंदनीय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button