Maharashtra

ऐतिहासिक बौध्द लेण्या तोडणा-या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय?? उत्तरेश्वर कांबळे

ऐतिहासिक बौध्द लेण्या तोडणा-या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय??
उत्तरेश्वर कांबळे

प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

महाराष्ट्रात बौध्दांवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे अनेक तरण्याबांड पोरांच्या दिवसा ढवळ्या हत्या केल्या जात आहेत..दादर येथील महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह याच्यावर हल्ला करण्यात आला त्याची तोडफोड केली. आणी आता मुंबईत अशोक कालीन ऐतिहासिक बौध्द लेण्या नेस्तनाबूत करण्याच काम हे जातीयवादी सरकार करत असुन त्यांच डोक ठिकाणावर आहे काय? असा टोला भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बौध्द लेण्या आहेत.त्या पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येतात म्हणून शासनाला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो त्यामुळे लेण्यांचे संवर्धन करण्याऐवजी तोडफोड करून शासनाला नक्की काय साध्य करायचे आहे.याबद्दल पुरात्वव विभाग, इतिहास प्रेमी लोक मुग गिळून गप्प आहेत. हा ऐतिहासिक अनमोल ठेवा जतन करून ठेवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे ती त्यांनी व्यवस्थित सांभाळली पाहिजे. असे ही उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button