Maharashtra

सर्वांचेच अंदाज चुकवेल शिवसेना :स्वातीताई मोराळे

सर्वांचेच अंदाज चुकवेल शिवसेना :स्वातीताई मोराळे

राहुल खरात
आदित्य ठाकरेंना विधिमंडळ पदी निवड न करता सर्वांना धक्का देत मा. एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. यामागे शिवसेना एकसंघ रहावी कोणत्याही परस्थिती मध्ये त्यामध्ये फुट पडु नये असाही असु शकतो. भाजपा हा विश्वास घातकी पक्ष आहे तो मित्र पक्षांना संपवून स्वतःची वाढ करत आहे. भाजपा बरोबर राहून पुन्हा पाच वर्षे सडू शकतात त्यापेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाहेरून पाठिंबा घेऊन एकट्या ने सरकार बनवावे असाही एक गट सेनेमध्ये आहे.

लोकांना नीतिधर्मांचे धडे देत काँग्रेस मुक्त भारत करायचे स्वप्न पहाणाऱ्या भाजपाच काँग्रेस युक्त झाली आहे. ओबीसी व बहुजन समाज आज भाजपा पासून दुर गेला आहे तो सेनेकडे वळू शकतो. भाजपा हा छोटे मासे खाणारा मोठा मासा बनत चालला आहे. ओबीसी, लहान पक्ष यांना खाऊन झाल्यानंतर सेनेचे लचके तोडणं चालू आहे.

ज्यांचे अर्ध्या पेक्षा जास्त उमेदवार काँग्रेसचें आहेत मग स्वतःचे अस्तित्व संपवण्यापेक्षा येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मनाची तयारी सेना करत आहे. मुंबई महानगर पालिकेतील पाठिंबा काढून घेतला तरी चालेल पण आत्ता झुकायचे नाही असा एक गट सेनेमध्ये तयार झाला आहे.

भाजपामधील अनेक नाराज लोक सेनेकडे, ओबीसी लोक सेनेकडे वळला जाऊ शकतो. याचा विचार सेना नेते करत आहेत. देवेंद्र फडणवीस सारख्या लोकांवर विश्वास ठेऊ नये असा एक मोठा गट सेनेमध्ये आहे. सेना यावेळी सर्वांचेच अंदाज चुकवू शकते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button