Faijpur

खान्देश नारीशक्ती तर्फे फैजपूर येथे पत्रकार बांधवांचा सन्मान

खान्देश नारीशक्ती तर्फे फैजपूर येथे पत्रकार बांधवांचा सन्मान

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

फैजपूर प्रतिनिधी: मराठी पत्रकार दिनानिमित्त काल दि.०६ रोजी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन फैजपूर वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. फैजपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कॉम्प्लेक्स मधील खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन कार्यालयात हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी पत्रकारितेचे पितामह आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार अरुण होले यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष हेमराज चौधरी उपस्थित होते. त्यानंतर खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा दिपाली चौधरी यांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण होले, वासुदेव सरोदे, पत्रकार संस्था फैजपूर अध्यक्ष फारुख शेख, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम पिंजारी, योगेश सोनवणे, संजय सराफ, प्रा.राजेंद्र तायडे, उमाकांत पाटील, , पत्रकार संरक्षण समितीचे राजू तडवी, शाकीर मलिक, निलेश पाटील, मयूर मेढे, नाज़िम शेख, इम्रान शेख, पार्थ झोपे इ.उपस्थीत होते. सुत्रसंचलन संजय सराफ यांनी तर आभार प्रदर्शन आयोजक खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा दिपाली चौधरी यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button